Soham Japachya Tiwra Sanyogane pran wa apan ek howun sushumna nadi wahu lagate. tyach barobar jagatmata wa sarv shaktinchi swamina kundalini shakti muladhar chakrapusun nighun ti sarv chranmadhun meru dhanala walase ghalit bhumadhyache thinkani asnarya aghya chakraparyant jate tehte ida, pingala shushmuna hya ek howun shushmunnach pudhe jate. human body its all about the Universe. The whole universe reside inside Human Body. Read More About it.
सोहं जपाच्या तीव्र संयोगाने प्राण व अपान एक होवून सुषुम्ना नाडी वाहू लागते. त्याच बरोबर जगतन्माता व सर्व शक्तीची स्वामिनी कुंडलिनी शक्ती मुलाधार चक्रापासून निघून ती सर्व चक्रामधून मेरु दंडाला वळसे घालीत घालीत भ्रुमध्याचें ठिकाणीं असणाऱ्या आज्ञां चक्रापर्यंत (अग्नी चक्रापर्यंत )जातें तेथे ईडा, पिंगला, सुषुम्ना ह्या एक होवून सुषुम्नाच पुढे जाते. दोन्ही भुवयांमध्ये व नासिकेच्या मुळाशी जे स्थान आहें. त्याल ‘त्रिकुट’ (शिवस्थान म्हणतात.किंवा केदारनाथ) म्हणतात. याच ठिकाणी गंगा (ईडा ) यमुना (पिंगला) आणि सरस्वती (सुषुम्ना )यांचा संगम झाला आहें यास त्रिवेणी संगम असे म्हणतात. ह्या त्रिवेणी शेजारीच अनुहताचा नाद म्हणजे सोहं,सोहं या शब्दांची अखंड गर्जना चालू होतें. जगदम्बा हि कुंडलिनी आज्ञां चक्रांचे ठिकाणीच आपला पराक्रम गाजवून राहतें असे नाहीं तर ती मस्तकाभोवती वळसे घेवून भ्रुमध्यांच्या वरच्या भागांत असलेल्या ब्रम्हरंध्रा च्या म्हणजे दशवेद्वाराच्या दहाव्या खिडकीच्या दारांमधून सहस्त्रदलांत हि प्राणासह लय पावते. या सहस्त्रदलाची कांती अवर्णीय, अपरंपार, अतुल्यनिंय अशी आहें. हि दिव्याज्योर्तीमय स्पटिकवत् अशी शुभ्र आहें. देहांतील सो$हं परमात्म्याचे हेंच ‘विश्रांती स्थान’ होय. यालाच उन्मनीय लावण्य, तुर्येचे तारुण्य, ओंकाराचा प्रांत, मोक्षाचा एकांत असें म्हणतात. इलाच सतरावी जीवनकला, अमृताचा झरा, कामधेनुचा पान्हा असे म्ह्नतात. * येथूनच एक एक अमृतबिंदू स्त्रवत असतो. पण हा बिंदू सामान्यमनुष्यामध्ये जठराग्नी वर पडून फुकट जातो. पण त्याचा सो$हं ध्यानमार्गे ‘पान’ केल्यास मनुष्य ‘अमर’ होतो.