अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांचे मनोमिलन




Like
Like Love Haha Wow Sad Angry

amitabh bacchan & raj thakre

महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी चित्रपट सेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सोमवारी राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांचे मनोमिलन झाले. सेनेचा 7 वा वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. राजकारण आणि बॉलिवूडमधील दोन महान व्यक्ती एका व्यासपीठावर येण्याचा योग यानिमित्ताने घडला.
”अमिताभ बच्चन एखाद्या राज्याचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे ब्रॅण्ड अँम्बेसड आहेत. अश्या शब्दात राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांची स्तुती केली. त्यांनी अजून म्हटले कि अलाहाबादच्या लोकांचे त्यांच्यावर जेवढे प्रेम आहे, तितकेच प्रेम महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस त्यांच्यावर करतो. बॉलिवूडमध्ये गेल्या शंभर वर्षांत अमिताभ बच्चन यांच्यासारखा महान कलाकार झाला नाही आणि पुढेही होणार नाही. अशी माणसे देवाने पाठवलेली असतात”, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांची स्तुती केली.

‘झाले गेले गंगेला मिळाले, माझ्यात आणि अमितजींमध्ये मागील दिवसांत जे काही झाले, ते माझे त्यांच्याशी असलेले वैयक्तिक भांडण नव्हते. मात्र मराठीच्या मुद्दय़ावर मी आजही ठाम आहे”, असे सांगत राज ठाकरे यांनी अमिताभ यांच्याशी सहा वर्षांपासून असलेली कटुताही आज संपविली आहे.

हिंदी भाषा फार गोड भाषा आहे. वाजपेयींनंतर इतकी चांगली हिंदी मी अमिताभ यांच्याकडूनच ऐकली, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

अमिताभ यांनी केली राज ठाकरे यांची प्रशंसा…
राज ठाकरे आणि अमिताभ सोमवारी एका मंचावर आले होते. यावेळी अमिताभ यांनी चक्क मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणात सिनेकलावंतांसाठी विमा पॉलिसीचा शुभारंभ केल्याबद्दल अमिताभ यांनी राज ठाकरे यांचे कौतूक केले.
मनसेला भविष्यात चांगल्या कामासाठी जर माझी मदत लागली तर त्यांनी हक्काने आवाज द्यावा, मी नक्कीच येईन, असंही बिग बी म्हणाले.

Gallery –

Amitabh Bachchan And Raj Thackrey Came Together,  Bonhomie was evident at the much-awaited meeting between Bollywood megastar Amitabh Bachchan and MNS chief Raj Thackeray.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu