संपूर्ण भारतात सध्या तरी काँग्रेसविरोधी लाट आहे – नरेंद्र मोदी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

narendra MODI

संपूर्ण भारतात सध्या तरी काँग्रेसविरोधी लाट आहे. त्यामुळेच काँग्रेसला पराभवाची भिती वाटत आहे. म्हणून काँग्रेसवाले शंखनाद करीत सुटले आहे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली. स्वतः देशाची वाट लावून मला शिव्या देण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत असल्याचे मोदीनि यावेळी म्हणालेत.
नरेंद्र मोदीनि आज उत्तर प्रदेशातल्या बहराइचमध्ये सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशात काँग्रेसविरोधी लाट असून केवळ आपला पराजय होईल या भीतीनंच काँग्रेस शंखनाद करत असल्याचा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला. मी टीव्हीवर दिसलो नाही तरी चालेन पण जनतेच्या मनात राहिलो पाहिजे, असे ते म्हणालेत.
काँग्रेस सरकारवर टीका करतानाच, मोदींनी उत्तर प्रदेश सरकारवरही कडाडून टीका केली आहे. उत्तर प्रदेशातले गुन्हेगार मोकाट फिरतायत तर निर्दोष मात्र जेलमध्ये सडत असल्याची टीका त्यांनी अखिलेश यादव सरकारवर केली. उत्तर प्रदेशात मोठ्याप्रमाणात धान्य उत्पादन होत होते. देशाला पुरेल इतके अन्नधान्य उत्पादन येथे पिकू शकते. मात्र, नाकर्त्या सरकारमुळे आज ते होत नाही. भाजपला सत्तेत आणा आणि बघा कसा विकास होतो ते, असे आवाहन करीत मतांचा जोगवा मोदींनी यावेळी मागितला.

UP can give India political stability, Bahraich (Uttar Pradesh), Nov 8: BJP’s prime ministerial candidate Narendra Modi addressed a mega rally here on Friday, Narendra Modi to perk up BJP’s campaign ahead of MP polls

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu