शिवसैनिकांवर उगारणारा हात मुळासकट उखडून टाकू – उद्धव ठाकरे
Like
Like Love Haha Wow Sad Angry

uddhav thakre

शिवसैनिकांवर उगारणारा हात मुळासकट  उखडून टाकू – उद्धव ठाकरे
कोकणभूमी हि देवभूमी आहे. इथे जास्त दिवस दहशतवाद हा खपून घेतला जाणार नाही, आता कोकण वासियांनी बिनधास्त राहावे. आज माझा शिवसैनिक पुन्हा जागा झाला आहे. आता कॉंग्रेसची “दादागिरी” संपली आहे, आता तर त्यांचे राजकीय थडगे बांधणार असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसैनिकांवर उगारणारा हात मुळासकट उपडून टाकू असा इशारा हि त्यांनी यावेळी दिला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या सांगण्यावरून सिंधदुर्ग पोलिसांनी रविवारी शिवसैनिकांना अमानुष पाने मारहाण केली. पोलिसांची हि गुंडागर्दी मोडून काढण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांना चोख प्रतिउत्तर दिले. या सर्व धुम्मचक्रित जखमी झालेल्या शिवसैनिकांना बाल देण्यासाठी उद्धव ठाकरे काल कणकवलीत आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, खासदार संजय राउत हे सुद्धा उपस्तीत होते.
कणकवलीत शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि सिंधादुर्गातील गुंडगिरीच्या विरोधात उभ्या थकलेल्या सामान्य लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले कि येथील भाडोत्री गुंडांनी कॉंग्रेसला बदनाम केले आहे. शिवसेनेच्या आधारावर काही लोक “दादा” झाले आहेत. पण आमच्या वैभव नाईक ने त्यांची लकत्तरे काढली आहे. एक शिवसैनिक तुमची हि गात झाली आहे. जर संपूर्ण शिवसेना इथे आली असती तर तुमचे काय झाले असते याचा जरा तुम्ही विचार करा, असा सणसणीत तोल शिवसेनाप्रमुखांनी या वेळी लगावला.

सुपारीबाज पोलिसांना उद्धव ठाकरेंचा इशारा
शिवसैनिकांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना सुद्धा धारेवर धरत उद्धव म्हणाले कि, दिल्ली आणि महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार आहे. भगवा अजून फडकणार आहे. शिवसैनिकांच्या प्रत्येक थेंबांचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. “सुपारीबाज” पोलिसांची बलाकलिस्ट तयार आहे. सत्ता आल्यानंतर आम्ही कुणालाही सोडणार नाही. शिवसैनिकांच्या अंगांवर उठणारा हात आम्ही मुळासकट उपडून टाकू. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला आहे.

कणकवलीत प्रचंड उत्साह, भगवा जोश –
उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कणकवलीच नव्हे तर संपूर्ण सिंधदुर्ग जिल्ह्यात प्रचंड उत्साह व भगवा जोश दिसून येत होता. शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी कणकवलीच्या दिशेने जाताना दिसत होत्या.

 Uddhav Thackeray Kankavli Visit after Police Lathicharge, Uddhav Thackeray VS Narayan Rane …Shiv Sena President Uddhav Thackeray visit in Kankavli.. Police Lathicharge on Shivsainik.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu