उद्धव ठाकरे आज कणकवलीत
उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडून सुपारी घेऊन पोलिसांनी रविवारी शिवसैनिकांना अमानुष मारहाण केली.कणकवली पोलिसांनी महिला, लहान मुले, वृद्ध यापैकी कुणाचीही पर्व न करता त्यांच्यावर अमानुष पाने लाठी हल्ला केला, व त्यांना बेदम मारहाण केली. कणकवली पोलिसांच्या या दादागिरी विरोधात संपूर्ण कणकवलीच नव्हे तर संपूर्ण सिंधदुर्ग जिल्ह्यात संताप व त्यांच्या निषेद केला जात आहे. पोलिसांनी आपली दादागिरी बंद करावी असा आवाज संपूर्ण जिल्ह्यात व्यक्त केला जात आहे. येथील नागरिकांनी तर सरळ राणेंच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सज्जड दम दिलेला आहे कि तुम्ही तुमची दादागिरी बंद करा अन्यथा परिणाम चांगले होणार नाही. राणेंच्या खर्या उदोगानाविषयी भांडाफोड करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हाहन केले होते. मात्र राणेंनी पोलिसांना समोर करून आणि आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करून या कार्यकर्त्यांवर पोलीसंकार्वे लाठीहल्ला केला. रविवारच्या या घटनेनंतर कणकवली परिसरात जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. संपूर्ण सिंधदुर्ग जिल्ह्यात राणे आणि पोलिसांविरुद्ध संतापाची लाट पसरलेली दिसत आहे. कणकवली येथील बाजारपेठ आजही बंदच आहे. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांची गर्दी वगळता सोमवारी संपूर्ण कणकवलीत शुकशुकाट पसरला होता.
या दरम्यान पोलिसांनी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्यासह तालुका प्रमुख सचिन सावंत, अनिल हळदिवे, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, प्रथमेश सावंत, अनिल सावंत, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. काळ सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजार केले असता त्यांना २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इकडे पोलिस अधिकश्यक अबिशेख त्रिमुखे यांनी म्हटले आहे कि शिवसैनिकांनी पोलिसांना वेठीस धरले होते व त्यांना काबीज करण्यासाठी लाठीचार्ग करणे भाग पडले. शिवसैनिकांनी शिवसेना कार्यालय समोर फटके फोडले त्यानुळे तिथे तणावाचे वातावरण तयार झाले होते व म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.पोलिस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी
काहीही गरज नसताना सामान्य नागरिकांवर केलेल्या लाठीहल्ल्याच्या या कारवाई ला येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असा इशारा शिवसेनेचे आमदार राजन सावली यांनी दिला आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा संपूर्ण निपटारा लागत नाही व या हल्ल्यामागे कोण आहे त्याचावर कारवाई होत नाही तोपर्यंत हिवाळी अधिवेशनाचे काम चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.राणेंची काळी कृत्ये लोकांसमोर येणारच
या सर्व प्रकरणाला पालकमंत्री नारायण राणे हेच जबाबदार आहेत, असे परखड मत राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसकर यांनी सांगितले आहे. कॉंग्रेस ने आव्हाहन दिले व शिवसेनेने ते स्वीकारले. यानुसार जर वैभव नेक यांना ती संधी मिळाली असती तर आज नारायण राणे यांची काळी कृत्ये लोकांसमोर आली असती. म्हणूनच राणे यांनी पोलिसांच्या साथीने हे सर्व दडपण्याचा पर्यंत केला. मी सत्ताधारी पक्षातील आमदार असलो तरी याप्रकारच्या गुंडगिरीच्या विरोधात आहे. आज दहशतीच्या सावटाखाली असलेली सिंधदुर्ग जिल्ह्यातील जनता जागृत झाली आहे. त्यामुळे आता तरी राणेंच काही खर नाही . हि तर सुरवात आहे असे केसकर या वेळी बोलताना म्हणाले आहे.