Shri Kedarnath, Kedarnath temple is located in Rudraprayag District of Uttarakhand State. Get all info about Shri Kedarnath Temple, Kedarnath Dham & Kedarnath Yatra
श्री केदारनाथ बारा ज्योतिर्लिंग पैकी एक अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. श्री केदारनाथ हे हिमालयाच्या शिखरावर वसलेलं आहे. इथे जाण्याचा रस्ता सुधा फारच कठीण आहे. या ठिकाणी नेहमी हिमवर्षाव होत असतो. आणि म्हणूनच या लिंगाचं दर्शन एका विशिष्ट वेळेलाच होतं.
श्री केदारनाथ ज्योतीर्लीगाविषयी एक फार प्राचीन कथा प्रचलित आहे. ती म्हणजे, या ठिकाणी एक त्रिकोणी दगड आहे. “महाभारताचे युद्ध संपल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी पांडव येथे आले होते. तेव्हा त्यांना या ठिकाणी एक रेडा आढळून आला. त्या रेड्याला भगवान शिव समजून पांडव त्या रेड्याच्या पाठीमागे धावू लागले. रेडा पळता-पळता एका खिंडीमध्ये येऊन पोहोचला. तेंव्हा त्याचं तोंड खिंडीच्या बाहेर गेलं. परंतु भीमाने आपल्या शक्तीच्या जोरावर त्याची शेपटी पकडून ठेवली. शेवटी झाले असे कि, त्या रेड्याचं तोंड नेपाळच्या दिशेनं गेलं आणि बाकी शरीर या ठिकाणीच राहिलं. नेपाळमध्ये याचं जे तोंड आहे त्याला पशुपतीनाथ म्हणतात.