मध्य प्रदेश मध्ये येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांसाठी येत्या सोमवारी मतदान होत आहे. मागील १० वर्षापासून मध्य प्रदेशातील सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. तर म्हध्याप्रदेशातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी कॉंग्रेस ने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. तर इकडे नरेंद्र मोदींच्या धुवाधार सभा व मागील १० वर्षात केलीली विकासकामे यांच्या बळावर यावेळीही आपणच सत्तेवर येणार असा विश्वास मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना आहे.
यावेळच्या फारच अटीतटीच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेच्या बाजूने दिग्विजय सिंग, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पौचोरी या नेत्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे तर, भाजपतर्फे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह कैलास विजयवर्गीय, याशोधाराजे सिंधिया यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
राजे महाराज्यांचा प्रदेश असलेल्या मध्यप्रदेशात यावेळी राजघराण्यातील चक्क १२ उमेदवार या निवडणुकीत आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यापैकी ८ जन भाजपतर्फे तर ४ जन कॉंग्रेस तर्फे आपले भवितव्य आजमावत आहेत. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या राघोगड मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र जयवर्धन सिंग निवडणूक लढवीत आहे. राजघराण्याशी संबंधित असलेल्या अन्य कॉंग्रेस नेत्यांमध्ये विक्रमसिंग नातीरजा (राजनगर), महेंद्रसिंग काळूखेडा (मुंगवली), यांचा समावेश आहे.
तर इकडे भाजपच्या वतीने राजघराण्यातून निवडणूक लढवणाऱ्या पैकी सर्वात वरचा क्रमांक येतो तो म्हणजे याशोधाराजे सिंधिया यांचा, त्या सध्या ग्वांल्हर मतदारसंघाच्या खासदार आहेत.