लक्ष्मीकांत बेर्डे
जन्म – ३ नोव्हेंबर १९५४
मृत्यू – १६ डिसेंबर २००४ मुंबई
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेमातील एक अत्यंत आवडते प्रभावशाली व्यक्तिमत्व. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना आपल्या अभिनयानी हसायला आणि रडायला लावले. ते मराठी चित्रपट श्रुष्टीतील महानायक आहेत. मराठी चित्रपटातील विनोदी नायक म्हणून त्यांनी आपले नाव कोरून ठेवले आहे.
लक्ष्मीकांत यांना सुरवातीपासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरवात गणेश उत्सवातील स्टेज शो पासून केली, कोन्कानास्थ वैश्य समाज, गिर्गौम गोत. त्यांनी शाळा कॉलेज मधील कार्यक्रमात सुद्धा भाग घेतला आणि त्या मध्ये खूप सारे पारितोषिक सुद्धा जिंकले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली ती मुंबई मराठी साहित्य संघ मधून १९८३-८४ मध्ये. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिला अभिनय केला तो म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या मराठी स्टेज शो टौर टौर मधून, आणि तो त्यावेळचा त्यांचा पहिला हिट अभिनय, आणि लोकांनी सुद्धा त्यांच्या विनोदी भूमिकेला दाद दिली.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला मराठी सिनेमा तो म्हणजे “लेक चालली सासरला”. त्यांचा दुसरा सिनेमा होता तो महेश कोठारे यांच्या सोबत. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला “दे दना दन” आणि काय तो सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला आणि आपला लक्ष्या मराठी माणसाच्या घराघरात पोहचला. त्यानंतर त्यावेळचे मराठी सुपर स्टार अशोक सराफ यांच्या सोबतचा “धूम धडाका”. हे दोन्ही सेनिमा त्यावेळचे सुपर हिट्स सिनेमे होते. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपर हिट सिनेमे केले. त्यांनी शेवटपर्यंत मराठी चित्रपट श्रुश्तीवर आपले साम्राज्य गाजविले. १९८६ ते १९९६ या काळातील त्यांचे काही गाजलेले चित्रपट आम्ही दोघे राजा राणी, हमाल दे धमाल, अशी हि बनवा बनवि, बाळाचे बाप ब्रह्मचारी, एका पेक्षा एक, भूताचा भाऊ, थरथरत आणि झपाटलेला. आणि लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट श्रुष्टीचे सुपर स्टार झालेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बरेचसे चित्रपट हे डिरेक्टर-अभिनेते महेश कोठारे किंवा डिरेक्टर-अभिनेते सचिन आणि अशोक सराफ यांच्या सोबत आहेत. मराठी चित्रपट श्रुष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी फारच गाजली आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटच नाही तर हिंदी चित्रपट श्रुष्टीठी काम केलेले आहे. त्यांचा पहिला हिंदी सिनेमा तो म्हणजे सूरज बर्जात्या यांचा १९८९ मधील “मैने प्यार किया”. हम आपके हैन कौन, मेरे सपनो कि राणी, आरझू, साजन, बेटा, १०० डेज आणि अनारी.हे त्यांचे काही गाजलेले हिंदी चित्रपट.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा २००४ मध्ये आकस्मिक मृत्यू झाला. आणि मराठी चित्रपट श्रुस्ति एका महानायकाला मुकली.
त्यांचे काही मराठी आणि हिन्दी चित्रपट खालीलप्रमाणे आहेत.मराठी चित्रपट
आधारस्तंभ (२००३), पछाडलेला (२००४), आधारस्तंभ (२००३), मराठा बटालियन (२००२), देखणी बायको नाम्याची (२००१), खतरनाक (२०००), नवरा मुंबईचा (२०००)
धांगड धिंगा (२०००), कमाल माझ्या बायकोची (२०००), आई थोर तुझे उपकार (१९९९), माणूस (१९९९), आपला लक्ष्या (१९९८), जनता जनार्दन (१९९८)
हमेशा (१९९५), तकदीरवाला (१९९५), जमला हो जमला (१९९५), धमाल जोडी (१९९५), सुन येती घरा (१९९५), टोपी वर टोपी (१९९५)
बजरंगाची कमाल (१९९४), चिकट नवरा (१९९४), माझा छकुला (१९९४), सोनियाची मुंबई (१९९४), प्रेमाच्या सुलट्या बोंबा (१९९४)
तू सुखकर्ता (१९९३), झपाटलेला (१९९३), सारेच सज्जन (१९९३), एक होता विदुषक (१९९२), जिवलगा (१९९२), हाच सुनबाई चा भाऊ (१९९२)
जीव सखा (१९९२), दे धडक बेधडक (१९९२), ठन ठन गोपाला (१९९२), शुभमंगल सावधान (१९९२), सगळे सारकेच (१९९२)
आयत्या घरात घरोबा (१९९१), अफलातून (१९९१), मुंबई ते मोरीशीयस (१९९१), येडा कि खुळा (१९९१), मस्करी (१९९१), एक गाडी बाकी अनादी (१९९१)
गोडी गुलाबी (१९९१), डॉक्टर डॉक्टर (१९९१), शमे तो शमे (१९९१), एक फुल चार हल्फ (१९९१), अपराधी (१९९१), शेजारी शेजारी (१९९०), धडाकेबाज (१९९०)
धमाल बाबल्या गणप्याची (१९९०), लपवा छपवी (१९९०), शुभ बोल नाऱ्या (१९९०), डोक्याला ताप नाही (१९९०), थांब थांब जाऊ नको लांब (१९९०)
इजा बीजा तिजा (१९९०), घाबरायचं नाही (१९९०), चंगू मंगू (१९९०), एका पेक्षा एक (१९९०), फेकाफेकी (१९९०), पटली रे पटली (१९९०)
कुलदीपक (१९९०), बाळाचे बाप ब्रह्मचारी (१९८९), भुताचा भाऊ (१९८९), थरथरत (१९८९), हमाल दे धमाल (१९८९), धरला तर चावतंय (१९८९)
राजान वाजवला बाजा (१९८९), चंबू गबाळे (१९८९), खट्याळ सासू नाठाळ सून (१९८९), कुठे कुठे शोधू मी तिला (१९८९), उतावळा नवरा (१९८९)
रिक्षावाली (१९८९), घरकुल पुन्हा हसवे (१९८९), आंटी ने वाझावली घंटी (१९८९), अशी हि बनवा बनवी (१९८८), किस बाई किस (१९८८)
रंगत संगत (१९८८), मज्जाच मज्जा (१९८८), घोळत घोळ (१९८८), सर्वाषेत्र (१९८८), मामला पोरींचा (१९८८), गुरांचा नवरा (१९८७)
चाल रे लक्ष्या मुंबईला (१९८७), दे दणादण (१९८७), प्रेम करूया खुल्लम खुल्ला (१९८७), पोरींची धमाल बापाची कामाल (१९८७)
खरा कधी बोलू नये (१९८७), प्रेमासाठी वाट्टेल ते (१९८७), कळतंय पण वळत नाही (१९८७), इरसाल कार्टी (१९८७), भाटक भवानी (१९८७)
धाकटी सून (१९८६), गडबड घोटाळा (१९८६), आम्ही दोघे राजा राणी (१९८६), तुझ्या वाचून करमेना (१९८६), धूम धडाका (१९८५)
लेक चालली सासरला (१९८५), सौभाग्याकांक्षिनी, दागीना, रंग प्रेमाचा, सत्वपरीक्षा, हसवा फसवी (१९९५), जिगर, चूमंतर, तुझ्याच साठी
पछाडलेला (२००४)मराठी ड्रामा
अबब विठोबा बोलू लागला, घरात हसरे तारे, पंडित आता तरी शहाणे व्हा, टौर टौर (१९८३), शांतेचं कार्त चालू आहे (१९८९)
बिघडले द्वार स्वर्गाचे, अश्वमेध, सर आले धून, कार्टी प्रेमात पडली, लेले वि. लेले, नांदा सौख्यभरेहिंदी फिल्म्स
हत्या (२००४), तौबा तौबा (२००४), मेरी बिवी का जवाब नाहीन (२००४), घर ग्रीहास्ती (२००४), पतली कमर लंबे बाल (२००४)
इन्सान (२००४), खंजर (२००३), बाप का बाप (२००३), तू बाल ब्रम्हचारी मीन हून कन्या कुंवारी (२००३)
हम तुम्हारे हीन सनम (२००२), प्यार दिवाना होता ही (२००२), भारत भाग्य विधाता (२००२), हेल्लो गिर्ल्स (२००१)
उल्झान (२००१), छुपा रुस्तम (२००१), बिवी और पडोसन (२००१), काम ग्रंथ (२००१), बेटी नो. १ (२०००)
शिकार (२०००), सबसे बडा बेईमान (२०००), रहस्य – द सुस्पेंस (२०००), राजाजी (१९९९), जानम समझा करो (१९९९)
आअर्शॊ (१९९९), लो मैन आ गया (१९९९), आंग हि आग (१९९९), दिल क्या करे (१९९९), कहाणी किस्मत कि (१९९९)
सर उठ के जियो (१९९८), दिवाना हून पागल नही (१९९८), हफ्ता वसुली (१९९८), मेरे सपनो कि राणी (१९९७)
झमीर (१९९७), झोर (१९९७), ढाल (१९९७), हमेशा (१९९७), कहर (१९९७), नझर (१९९७), गंगा मांगे खून (१९९७)
अजय (१९९६), चाहत (१९९६), मासूम (१९९६ फिल्म) (१९९६), साजन कि बाहोन मेईन (१९९५)
खिलोना बना खलनायक (१९९५), तकदिरवाला (१९९५), हथकडी (१९९५), ब्रह्मा (१९९४), हम आपके हैन कौन (१९९४)
दिलबर (१९९४), द जेन्टलमन (१९९४), क्रांती क्षेत्र (१९९४), जनता कि अदालत (१९९४), ब्रह्मा (१९९४)
क्रिमिनल (१९९४), संतान (१९९३), सैनिक (१९९३), गुमराह (१९९३), फुल और अंगार (१९९३), क्रिशन अवतार (१९९३)
अनारी (१९९३), दिल कि बाझी (१९९३), आदमी खिलोना है (१९९३), हस्ती (१९९३), संग्राम (१९९३), तह (१९९३)
गीत (१९९२), अनाम (१९९२), दिदार (१९९२), दिल का क्या कसूर (१९९२), बेटा (१९९२), आय लव यु (१९९२), परदा है परदा (१९९२)
कसक (१९९२), साजन (१९९१), डान्सर (१९९१), प्रतिकार (१९९१), १०० डेसं (१९९१), त्रिनेत्र (१९९१), मैने प्यार किया (१९८९)gallery-
–
Legends Of Marathi Cinema – Laxmikant Berde, Remembering Marathi Legends : Laxmikant Berde. Lakshmikant Berde was a legendary Marathi actor