मतांसाठी फोडाफोडीचे राजकारण करू नका – उद्धव ठाकरे
भारतात राज्य करण्यासाठी इंग्रजांनी ज्याप्रकारे फोडाफोडीचे राजकारण केले त्याप्रमाणे तुम्ही राजकारण करू नका असा सज्जड दम शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दिल्लीत बसून आंध्रप्रदेशचा सत्यानाश करण्याचे काम कॉंग्रेस ने चालविले आहे. दिल्लीत बसून केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करू नये, असा इशारा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला आहे. आंध्रप्रदेशच्या विभाजाला प्रचंड विरोध होत असतानाही स्वतंत्र तेलंगाना निर्मितीचा बेत कॉंग्रेस सरकारने घातला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते जगमोहन रेड्डी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी जाऊन भेट घेतली. व साधारणता तासभर चर्चा केली. आंध्रप्रदेशच्या विभाजनाचा निर्णय घेताना त्यासाठी आवक्श्यक असणारी कोणतीही आवक्श्यक कारवाही पार पाडण्यात आलेली नाही. यामुळे शिवसेनेने केंद्रसरकारच्या या निर्णयाच्या विरोधात लोकसभा आणि राज्यसभेत कायएसआर कॉंग्रेसच्या भूमिकेला पाठींबा देऊन आंध्रच्या विभाजनाचा डाव हाणून पाडावा अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, कारण नसताना कुणाच्या तरी स्वार्थासाठी राज्याची तोडफोड करणाऱ्या या सरकारला शिवसेनेचा सुरवातीपासूनच विरोध आहे. आंध्रच्या बाबतीत जे काही चालले आहे ते चुकीचे असून सर्वप्रथम याबाबत आंध्रच्या विधानसभेत या बाबतचा ठराव पारित करण्यात यावा आणि त्यानंतर संसदेत सुद्धा हा ठराव पारित करण्यात यावा. आणि तो बहुमतांनी मंजूर करण्यात यावा असे यावेळी बोलताना ते म्हणाले. दिल्लीत बसून उगाच सामान्य जनतेवर कोणतेही निर्णय लादले जाऊ नये.छोट्या राज्याच्या निर्मितीसाठी आमचा विरोध नाही परंतु काही लोकांच्या स्वार्थासाठी सरकारचे पाप राज्याच्या माथी लादले जाऊ नये. अशी शिवसेनेची भूमिका आहे. स्वतन्त्र विदर्भात सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुखांनी हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ नकोच अशी ठाम भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सुद्धा म्हटले आहे.
भाषेच्या आधारावर जर प्रांत रचना करण्यात येत असेल तर मराठी जनतेचा प्रचंड विरोध असताना सुद्धा मराठी भूभाग हा कर्नाटकला देण्यात आला. त्या ठिकाणची जनता आजही महाराष्ट्रात यायला तयार आहे व त्यासाठी आजही ते लढा देत आहे. खरोखरच जर भाषेच्या आधारावर प्रांतांची रचना झाली असेल तर जो हिस्सा महाराष्ट्रात यायला हवा होता त्याचा कर्नाटकात समावेश करून मराठी जनतेवर अन्याय कशासाठी केला जात आहे. असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला केला आहे.
आन्द्रप्रदेश चे विभाजन केवळ राजकीय हेतू समोर ठेऊन केले जात आहे. त्यामुळे या निर्णयाला बहुतांश लोकांचा विरोध असताना सुद्धा विधानसभेत कोणतीही घटनात्मक कार्यवाही पार न पडता स्वतंत्र तेलंगाना निर्मिती केली जात आहे.
Jagan Mohan Reddy meets Uddav Thackeray over AP bifurcation, YSR Congress chief Jaganmohan Reddy met Shiv Sena leader Uddhav Thackeray here on Monday.