आज आश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करण्याची आपली परंपरा आहे. तशीच एक आजच्या दिवसाची एक कथा सुद्धा आहे. पुरातन काळातील भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजांचा पुत्र त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी मारणार असतो. आपल्या मुलाने मरण्याआधी सर्व सुखांचा उपभोग घ्यावा म्हणून राजा त्याचे लग्न लाऊन देतो. मात्र त्यानंतर चारच दिवसांनी त्याच्या मरणाचा दिवस असतो. म्हणून त्या रात्री त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहर ठेवल्या जातात. महालाचे प्रवेश द्वारही सोन्या चांदीने भरून ठेवलेले असते. सर्व महालात दिवे लाऊन प्रकाशित केले जाते. त्याची पत्नी त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्याला जागे ठेवते.
जेंव्हा यम सर्परुपात राजकुमारच्या खोलीत प्रवेश करतो त्या वेळी मात्र त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात. त्यामुळे यम थेथून निघून जातो. म्हणून आजच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लाऊन त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करावा. नमस्कार करतेवेळी ” मृत्युना दान्द्पासाभ्या कालेन श्यामायासह, त्रयोदश्या दिपादानात सूर्यज: प्रीयता मम ” हा मंत्र म्हणून जर दिव्यास नमस्कार केला तर अपमृत्यू टाळतो.
या दिवसाची अजून एक दंथ कथा आहे ती म्हणजे समुद्रमंथन. जेंव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्रमंथन केले, त्यावेळी दिवे लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वन्तरिचिहि आजच्या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. आजच्या दिवशी नवीन कपडे , भांडे, सोने यांची खरेदी केली जाते.