महाराष्टातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी सीमावासियांचा प्रश्न स्तानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेत संपूर्ण ताकदीनिशी मांडेल या साठी शिवसेना शेवटपर्यंत पर्यंत करणार आहे. सीमा प्रश्नावरील कारवाई चा निर्णय लागेपर्यंत हा भाग केंद्राशाशित व्हावा म्हणून शिवसेना प्रखर लढा देणार आहे अशी ग्वाही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तीच ग्वाही देण्यासाठी मी इथे आलो आहे, असे जोरदार प्रतिपादन मुंबईचे महापौर यांनी बेळगावच्या महामेळाव्यात सीमावासियांना दिली आहे.
कर्नाटक सरकारचा जुलमी कारभार आणि बेळगावात विधीमान्दालाचे अधिवेशन भरविण्याच्या कृतीला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी आज मराठी जनतेने आपला आवाज बुलंद केला आहे. बेळगावात वाक्सीन डेपो मैदानावर हा महामेळावा घॆत कानाकोपर्यातून आलेल्या हजारो सीमावासीयांनी ” बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, राहणार तर महाराष्ट्रात, नाही तर तुरुंगात” असा नर त्यांनी दिला. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या वतीने उपस्तीत राहून या मेळाव्याला बाल दिले आहे. यावेळी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार के.पी.पाटील, शेकापचे जेष्ठ नेते प्रा,एन. डी. पाटील, यांच्यासह एकीकरण समितीचे असंख्य प्रतिनिधी यावेळी येथे उपस्तीत होते. सीमा लढ्यातील शहिदाना अभिवादन करून या मेळाव्याला सुरवात करण्यात आली होती.
रस्त्यावरच्या लढ्यातही मागे हातू नका- एन.डी.पाटील
सीमा भागात न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरच्या लढाईतहि मागे हातू नका, असे आव्हाहन एन.डी.पाटील यांनी केले आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषकांनी एकी दाखून दोन आमदार निवडून आणले आणि बेळगाव महानगर पालिकेवर भगवा फडकवला तसाच कर्नाटक सरकारचा अन्याय संपूर्ण ताकदीनिशी परतून लावा असेही यावेळी ते म्हणाले.
शिवसेनेचा आण्यायला चोख प्रतीउत्तर
“हिंदूसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे” यांनी सीमा प्रश्न सोडविण्यासाठी रणशिंग फुंकले.बेळगाव सीमावासीयांसाठी १९६८ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी पहिली सभा घेतली. त्यानंतर मुंबईत झालेल्या आंदोलनात ६९ शिवसैनिक हुतात्मा झालेत. शिवसेनेची सीमावासियांना हीच बांधिलकी आहे. कर्नाटकात मराठी भाशियांवर होणार्या अन्यायाविरोधात शिवसेना सदैव रस्त्यावर उतरली आहे. आण्यायला कसे उत्तर द्यायचे हे शिवसेनेला चांगलेच माहिती असून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक सिमाबंधावांच्या मागे कणखरपणे उभे आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी सीमा प्रश्ना बाबत राष्ट्रपती व केंद्र सरकार कडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. आता केवळ विधानसभेत ठराव करण्यापेक्षा सरळ त्याची आमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुखामान्त्र्यानी पर्यंत करावेत, असे आवाहन मुंबईचे महापौर प्रभू यांनी केले आहे.
कान्नादिगानि केला हैदोस
कर्नाटक सरकारने बेळगावात भरविलेल्या विधानसभा अधिवेशनाचा निषेद करीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील व अनिल पाटील यांनी सभात्याग केला आणि मराठी भाषकांच्या मेळाव्याला हजेरी लाविली. त्यामुळे संतापलेल्या कानडी लोकांनी हैदोस मांडला. त्यांनी संभाजी पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला केला. तसेच त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर सुद्धा दगडफेक केली. इतक्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी महामेलाव्याला जात असलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरही हल्ला केला.