बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात आता दरी निर्माण होण्याची दाट शक्यता




Like
Like Love Haha Wow Sad Angry

bacchan family

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात आता दरी निर्माण होण्याची दाट शक्यता असून जया बच्चनमुळे ऐश्वर्या रॉय-बच्चनला आता बच्चन कुटुंबपासून वेगळे व्हायचे आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. खासगी आयुष्यात जया बच्चन जास्त लक्ष देत असल्याने ऐश्वर्या तिच्या पतीसह दुस-या घरात राहायला जाणार आहे असे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.
२००७ मध्ये अभिषेक बच्चनचा विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉयशी विवाह झाला होता. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबीय म्हणजेच अमिताभ-जया आणि अभिषेक-अ‍ॅश एकत्र राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि जया बच्चनमध्ये वारंवार खटके उडू लागल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अमिताभ आणि अभिषेक हे दोघेही ऐश्वर्याला मोकळीक देत असताना दिसतात. मात्र जया बच्चन ऐश्वर्याच्या आयुष्यात जास्त दखल देत असून ऐश्वर्याला तिच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडीची माहिती सासू जया बच्चनला द्यावी लागते. त्यामुळे ऐश्वर्या सासूवर नाराज असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात जया बच्चन छायाचित्रकारांवर बरसल्या होत्या. छायाचित्रकार ऐश्वर्याला तिच्या नावाने हाक मारत होते. त्यामुळे सासूबाईंचा पारा चढला आणि त्यांनी ऐश्वर्या..ऐश्वर्या काय बोलता, ती तुमच्या वर्गात शिकत होती का ? असा सवालच छायाचित्रकरांना विचारला होता. सासूबाईंच्या अशा वर्तनावर अ‍ॅशने पती आणि सासरेबुवांकडे तक्रार केली नसली तरी यामुळे ती त्रस्त झाली आहे असे म्हणायला आता तरी काही हरकत नाही.
ऐश्वर्याची मुलगी आता दोन वर्षाची झाली असून ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये पदापर्ण करण्याचा विचार करीत आहे. सासूबाईंच्या अशा दखलबाजीमुळे काम करणे अशक्य होईल. त्यामुळे ऐश्वर्याला आता सासू-सास्र्यांपासून -यांपासून विभक्त होऊन दुस-या घरात राहायला जाण्याचे वेध लागल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

Amitabh Bachchan and his family, See Bachchan family Latest News, Photos, Biography, Videos and Wallpapers. Bachchan family.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu