नाशिकजवळ असलेल्या घोटी येथे मंगला एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. काही गाड्या मनमाडहून दौंड मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून तीन ठार झाल्याचे सांगितले आहे. तर ३५ जन गंभीर जखमी असल्याचे समजते.
मनमाडहून सुटणारी मनमाड – मुंबई पंचवटी एक्स्प्रेस , मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रॆस या गाड्या रद्द करण्यात आल्या तर राजेंद्र नगर- मुंबई जनता एस्क्प्रेस, नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर- मुंबई हॉलिडे स्पेशल एस्क्प्रेस, रांची -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या मनमाडहून दौंड मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत.
रद्द झालेल्या गाड्यांचे नाव व नंबर
22101 लोकमान्य टिळक टर्मिनस – मनमाड एक्स्प्रेस राज्यराणी
12109 छत्रपती शिवाजी टर्मिनस- मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
51153 छत्रपती शिवाजी टर्मिनस – भुसावळ पॅसेंजररद्द झालेल्या उप गाड्यांचे नाव व नंबर
22102 मनमाड – नाशिक स्टेशनवर लोकमान्य टिळक टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस
12110 मनमाड – छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस – भुसावळ
51154 – छत्रपती शिवाजी टर्मिनस पॅसेंजर -नांदेड
17618 – छत्रपती शिवाजी टर्मिनेट नांदेड तपोवन एक्सप्रेस.17617 छत्रपती शिवाजी टर्मिनस नांदेड तपोवन एक्सप्रेस ही गाडी कल्याण येथे रद्द
वळविलेल्या गाड्यांचे नाव व नंबर ( डाऊन )
12859 छत्रपती शिवाजी टर्मिनस- हावडा गीतांजली एक्स्प्रेस कल्याणमार्गे पुणे- दौंड- मनमाड
15017 लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी एक्सप्रेस काशी कल्याणमार्गे पुणे- दौंड- मनमाड
12534 सीएसटी – लखनौ पुष्पक एक्स्प्रेस कल्याणमार्गे पुणे- दौंड- मनमाड
15647 लोकमान्य टिळक टर्मिनस – गुवाहाटी एक्सप्रेस वसई रोडमार्गे जळगाव
12165 लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी रत्नागिरी एक्स्प्रेस कल्याणमार्गे पुणे- दौंड- मनमाडवळविलेल्या गाड्यांचे नाव व नंबर (अप )
13201 राजेंद्रनगर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मनमाडमार्गे दौंड, पुणे- कल्याण
12140 नागपूर – सीएसटी सेवाग्राम एक्सप्रेस मनमाडमार्गे दौंड, पुणे- कल्याण
01014 नागपूर – सीएसटी विशेष मनमाडमार्गे दौंड, पुणे- कल्याण
18609 रांची – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मनमाडमार्गे दौंड, पुणे- कल्याण
12321 हावडा एक्सप्रेस सीएसटी मनमाडमार्गे दौंड, पुणे- कल्याण
12880 भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मनमाडमार्गे दौंड, पुणे- कल्याणहेल्पलाईन क्रमांक
* कल्याण – 0251 – 2311499
* इगतपुरी – 02553-244020
* पनवेल – 022-27468833
* सीएसटी- 022-22694040
* त्रिचूर – 0487-2430060
* एर्नाकुलम – 0484-2100317
* नवी दिल्ली – 011-23341074 / 011-23342954
* हजरत निजामुद्दीन – 011-243597