उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात सोन्याच्या खजिन्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. गुरूवारी केलेल्या खोदकामात घोड्याचा सांगाडा आणि एक चूल सापडली. त्यामुळे सोन्याचे स्वप्न अजून दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दौंडियाखेडी येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत २५ सेंटीमीटर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, या खोदकामात अजून तरी सोने मिळण्याची शक्यता नाही. उन्नावचे उप जिल्हाधिकारी विजय शंकर दुबे यांनी सांगितले, दौंडियाखेडा स्थित राजा राव रामबख्श सिंह यांचा खंडरनुमा किल्ला आहे. आतापर्य़ंत या किल्यावर फक्त २.१७ मीटर खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामात काचेच्या बांगड्या, भांड्याचे काही तुकडे, मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत. याला पुरातन महत्व असू शकते. याशिवाय घोड्याचे पाय, छोटे कासवाचा सांगाडा, तुटलेल्या बांगड्या आणि एक घर चूल सापडली आहे, अशी माहिती दुबे यांनी दिली.
याआधीच्या खोदकामात प्राचीन भींत, खांबचा भाग, मातीची तुटलेली भांडी, लोखंडाच्या चाव्या सापडल्यात. याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परीक्षण करण्यात येत आहे. सध्या तरी या वस्तूंना पुरातन महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. या खोदकामाच्यावेळी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.
तसेच खोदाई करण्यात येत असलेल्या भागात बॅरीकेटींग लावण्यात आले आहे. तसेच येथे मीडियाला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, सोने मिळण्याची शक्यता कमी असल्याने लोकांची गर्दी आता कमी होऊ लागली आहे. सध्याच्या गर्दीच्या ठिकाणी केवळ पोलीस आणि स्थानिक मीडियाचे कर्मचारी पाहायला मिळत आहेत.
Read News About: Unnao’s gold site could have more ancient history.