जम्मू-काश्मीर आणि सीमा रेषेवर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ले सुरु असतानाच भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकला खडे बोल सुनावले आहे. दहशतवादी हल्ल्याशी संबंध नसल्याचा पाकचा दावा असला तरी हे दहशतवादी आभाळातून येतात का? येत्या काही दिवसांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यूरोप दौ-यावर जाणार आहेत. या दौ-याच्या पार्श्वभूमीवर यूरो न्यूज या वृत्तवाहिनीने मुखर्जींशी संवाद साधला. यात मुखर्जींनी भारताश्या निगडीत प्रश्नांवर भाष्य केले. भारत-पाक सीमारेषेवरील तणावासंदर्भात मुखर्जी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मुखर्जी म्हणाले, भारताला पाकमध्ये हस्तक्षेप करायची इच्छा नाही किंवा पाकच्या बाबतीत काही छुपे आर्थिक धोरण नाही. भारताला फक्त शांतता हवी आहे. दहशतावादाविषयी बोलताना मुखर्जींनी पाकच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘भारतातील दहशतवादात हात नसल्याचे पाक सांगते. मग भारतात येणारे दहशतवादी आभाळातून येतात का?. पाक या हल्ल्यांना समर्थन देत नसेल.पण हे सर्व दहशतवाही पाकमधूनच येतात. त्यामुळे पाकने दहशतवाद्यांचे तळ उध्द्वस्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवे असे त्यांनी सांगितले. या मुलाखातीत त्यांनी आर्थिक स्थिती आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरही भाष्य केले.