संस्कृतीचे प्रतिक – दिवाळी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
232

Diwali, or Dipawali, is India’s biggest and most important festival of the year. Deepawali or Diwali is the biggest of all Hindu festivals. Diwali Festival In India.

diwali

दिवाळी म्हणजे दिव्यांनी संपूर्ण घर सजविणे. दीपावली हा शब्द “दीप” आणि “आवली” या शब्दांपासून बनलेला आहे. “दीप” म्हणजे दिवा, आणि ” आवली” म्हणजे रांग. म्हणजेच दिव्यांची रांग. भारतात दिवाळीचे सामाजिक आणि धार्मिक असे अनन्यसाधारण महत्व आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजेच अंधारातून उजेडाकडे मार्गक्रमण करणे. दिवाळी हा सन संपूर्ण भारतात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा सन सिख, बौद्ध आणि जैन धर्मातील लोक सुद्धा साजरा करतात. पुरातन मन्यते नुसार असे मानले जाते कि दिवाळीच्या दिवशी अयोध्येचे राजा प्रभू श्री रामचंद्र आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून परत आले होते. त्यामुळे अयोध्यावासियांनी त्यांच्या स्वागतासाठी आपले घर दिव्यांनी सजविले होते. कार्तिक महिन्यातील अमावसेची काळी रात्र त्या दिवशी दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाली होती. तेंव्हापासून तर आजपर्यंत भारतात प्रत्येक वर्षी हा सन मोठ्या उल्हासात साजरा केला जातो. दिवाळी हा सन प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी किंवा नोवेंबर महिन्याच्या सुरवातीला येत असतो. दिवाळी हा प्रकाशाचा सन आहे. दिवाळी हा दिव्यांचा सन आहे. यालाच दिवाळी किंवा दीपावली सुद्धा म्हणतात. दिवाळी हा सन आन्दारातून प्रकाशाकडे जाण्याचा सन म्हणून आपण साजरा करीत असतो. दिवाळी हे प्रकाशाचे प्रतिक आहे. आपल्या भारतीय लोकांचा विश्वास आहे कि “सत्य की सदा जीत होती है झूठ का नाश होता है”. दिवाळी आपल्याला हेच सांगते कि ” असतो माऽ सद्गमय , तमसो माऽ ज्योतिर्गमय”. दिवाळी हा सन स्वच्छता व प्रकाशाचे प्रतिक आहे. म्हणूनच आपण दिवाळीच्या कितीतरी आधीपासून आपल्या घराची साफसफाई करीत असतो.

दिवाळीचा धार्मिक संदर्भ:

दिवाळीच्या दिवशी आपले संपून घर दिव्यांनी सजवायला सुद्धा वेगवेगळ्या कहाण्या आहेत. राम भाक्तानुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र लंकेचे अत्याचारी राजा रावणाचा वाढ करून दिवाळीच्या दिवशी अयोध्येला परत आले होते. म्हणून त्यांच्या स्वागतासाठी त्या दिवशीपासून आपण दिवाळी हा सन साजरा करीत आहोत. तसेच कृष्ण भक्तानुसार दिवाळीच्या दिवशी भगवान श्री कृष्ण नि अत्याचारी राजा नरकासुर चा वध केला. या नरकासुर राक्षसाचा वध केल्यामुळे लोकांना फार आनंद झाला व म्हणून त्यांनी त्या दिवशी आपला आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घरी दिवे जाळून हा दिवस साजरा केला. अजून एका पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री विंष्णु नि  नरसिंह रुप धारण करून हिरण्यकश्यप राक्षसाचा वध केला. आणि अजून याच दिवशी समुद्रमंथन च्या वेळी लक्ष्मी व धन्वंतरि प्रकट झाल्या होत्या. जैन धर्मातील लोकानुसार जैन धर्माचे चोविसावे  तीर्थंकर महावीर स्वामीन चा निर्वाण दिवस सुद्धा दिवाळीच्या दिवशी आहे. सिख धर्मातील लोकांसाठी पण दिवाळी हा सन अतिशय महत्वाचा आहे. कारण याच दिवशी अमृतसर मध्ये १५७७ ला स्वर्ण मंदिराचा शिलान्यास झाला होता. आणि याच दिवशी १६१९ शिखांचे सहावे गुरु हरगोबिन्द सिंह जी यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. नेपाल मध्ये सुद्धा दिवाळीचा सन साजरा केला जातो कारण याच दिवशी नेपाल मध्ये नवीन वर्षाची सुरवात होत असते.

स्वामी रामतीर्थ यांचा जन्म व महाप्रयाण हे दोन्हीही दिवलीचाच दिवशीचे आहेत. स्वामी रामतीर्थानी दिवाळीच्या दिवशी गंगाटतावर आंघोळ करत असतानी ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. दीन-ए-इलाही चे प्रवर्तक मुगल सम्राट अकबर यांच्या शाषणकाळात सुद्धा दौलतखान्याच्या समोर ४० फूट उंच बासावर एक मोठा आकाशदीवा दिवाळीच्या दिवशी लात्कावला जात असे.  बादशाह जहाँगीर सुद्धा दिवाळी हा सन मोठ्या उत्साहात साजरा करीत असे. मुगल वंशाचे शेवटचे  सम्राट बहादुर शाह जफर दिवाळीला सन म्हणून साजरा करीत असे, व ते त्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात सुद्धा हजार राहत असे. शाह आलम द्वितीय यांच्या कारकिर्दीत सुद्धा शाही महाल संपूर्ण दिव्यांनी सजविला जात असे, आणि लालकील्यावर आयोजित कार्यक्रमात लालकील्यावर हिंदू आणि मुसलमान धर्मातील लोक भाग घेत असे.

सणांचा समूह म्हणजे दिवाळी :

दिवाळी हा काही एक दिवशीचा सन नाही तो तर सणांचा समूह आहे. दसऱ्या नंतर दिवाळी च्या तयारीला सुरवात केली जाते. दिवाळीच्या दोन दिवस आधी धनतेरस साजरा केला जातो. या दिवशी बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी केली जाते. धनतेरसच्या दिवशी भांड्यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. प्रत्येकच परिवार आपापल्या ऐपतीनुसार काही ना काही घेत असतो. या दिवशी तुलसी जवळ किंवा घराच्या आंगणात दिवा लावला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी म्हणजेच लहान दिवाळी. या दिवशी यम  पूजेसाठी दिवे लावले जातात. तिसरा दिवस म्हणजे दिवाळी लक्ष्मी पूजन. या दिवशी घरामध्ये सकाळपासूनच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्यास सुरवात केली जाते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते.  नंतर सायंकाळी लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर फटाके फोडून हा सन साजरा केला जातो. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी भगवान श्री कृष्णनि गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलून इंद्रदेवाच्या कोपापासून ब्राजवासियांचे रक्षण केले होते. या दिवशी लोक आपले गाय-बैल यांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात. त्या दिवशी शेणाचे पर्वत बनवून त्यांची पूजा केली जाते. दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. त्यानंतर दिवाळीच्या शेवटच्या दिवशी व्यापारी आपले जुने वहीखाते बदलवून नवीन वापरात आणतात. त्या दिवशी ते दुकानामध्ये लक्ष्मी पूजन करीत असतात. कारण असे केल्यानी धनाची देवी लक्ष्मी मातेची त्यांच्यावर कृपा राहते. तसेच शेतकरी वर्गासाठीही या दिवसाचे विशेष महत्व असते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
232




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu