नारायण साईं विरोधातल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करत असलेल्या सुरतच्या पोलीस अधिकारी शोभा भुताडे यांना जशरत सिंग नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. नारायण साईंविरोधात यापुढं अधिक चौकशी कराल तर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल या भाषेत त्यांना धमकावण्यात आलंय.
शोभा भुताडे यांना फोन करणारा जशरत सिंग स्वत:ला सेवादार म्हणतो. काल बलात्कार प्रकरणात सुरत मधील उमराह पोलीस स्टेशनमध्ये आसाराम बापूंविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे, आणि त्यानंतर त्यांना धमकीचा फोन करण्यात आला.
त्यानंतर चौकशी केल्यानंतर तो मध्य प्रदेशातल्या जशरत सिंग यांनी फोन केल्याच समजतंय. यासंदर्भात पोलीस आणखी तपास करीत आहेत. आता मात्र कालच्या प्रकारामुळे आसाराम बापू आणि नारायण साई या पिता-पुत्रांच्या अडचणीत अधिकच वाढ झालीय.