शिवसेनेची डरकाळी शिवाजी पार्कमधेच
दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये राजकीय भाषणे होणार नाही, आणि आवाजाची मर्यादा ओलांडली जाणार नाही, या दोन प्रमुख अटींवर मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला मंगळवारी मान्यता दिली आहे. २८ डिसेंबर रोजी हेच मैदान मिळावे म्हणून कॉंग्रेसने केलेल्या अर्जावर येत्या शुक्रवारी हायकोर्टात निर्णय होणार आहे.
गेली ४७ वर्षे शिवसेनेच्या दसरा हा शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. १३ ऑक्टोंबर रोजी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपलब्ध होण्यासाठी शिवसेनेने केलेल्या अर्जावर मुख्य न्या.मोहित शहा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना वेकॉम ट्रस्ट ने विरोध केला होता. मात्र महापालिका व राज्य सरकारने शिवसेनेला फार विरोध केला नाही. शिवसेनेचा हा धार्मिक व पारंपारिक मेळावा असून त्यामध्ये आपट्याची पाने वाटले जाते. प्रभू श्री रामचंद्राचे प्रतिक म्हणून हा मेळावा साजरा केला जातो. आजूबाजूचे लोक सुधा या मेळाव्याला येतात. त्यासाठी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, असे सरकार तर्फे सांगण्यात आले. दसरा मेळावा हा शिवसेनेचा पारंपारिक मेळावा आहे कोर्टाच्या अटींचे पालन करून हा मेळावा होणार आहे.