सचिन तेंडूलकरनि क्रिकेट मधून सन्यास घेण्याचा कठोर निर्णय आज घेतला आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले कि हि खूप काठी वेळ आहे. क्रिकेट शिवाय मी आयुष्याची कल्पना हि करू शकत नाही.
क्रिकेट मधून संन्यासाची घोषणा केल्यानंतर सचिन ने म्हटले कि ‘ माझे आयुष्यात देशासाठी खेळण्याचे स्वप्न होते. गेल्या २५ वर्षात मी प्रत्येक दिवशी या स्वप्ना सोबत जगात होतो. मला क्रिकेट शिवार जगणेच कठीण आहे. कारण मी ११ वर्षाचा होप्तो तेंव्हापासून मी या खेळामध्ये गुंतलो आहे.
देशासाठी खेळणे हि माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी आपल्या घरच्या मैदानावर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळून मी या खेळापासून दूर जात आहे.
‘ गेल्या काही वर्षात बीसीसीआई नि जो मला साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि त्याच्यासोबतच मी माझ्या घरच्यांचा सुद्धा आभारी आहे, कारण त्यांनी जो संयम पाळला आणि माझ्या भावनांना समजून घेतले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि त्यानंतर मी माझ्या प्रशनशाकांचा सुद्धा आभारी आहे, ज्यांनी त्यांच्या शुभकामना देऊन मला नेहमी सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास भाग पाडले.