ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग ने पुन्हा सचिन वर सूड उगवायला सुरवात केली आहे. मंकीगेट वादावरून पॉटिंगने सचिनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. हरभजन ला मंकीगेट प्रकरणात वाचविण्यासाठी सचिनने केलेले वक्तव्य ऐकून मी स्तब्ध झाल्याचे पॉटिंगने म्हटले आहे. ‘ द क्लोज ऑफ प्ले’ या आपल्या आत्मचरित्रात पॉटिंगने हे म्हटले आहे की, मंकीगेट प्रकरणाच्या सुनावणीवेळी सचिन तेंडुलकरने हरभजनची बाजू घेतली होती. मॅच अधिकारी माइक प्रोक्टर यांनी सायमंड् विरुद्ध कथित वंशभेदी टिप्पणी केल्याबद्दल हरभजन सिंग ला निलंबित केले होते. त्यावेळी हरभजन ने मात्र गप्प राहणे पसंत केले होते. २००८ मध्ये सिडनी टेस्टवेळी हरभजनने सायमंडला मंकी(माकड) म्हटले होते. पण हि गोष्ट सचिनने मॅच अधिकारी माइक प्रोक्टर यांना ही गोष्ट अगोदरच का सांगितली नाही. त्यावेळी हरभजनला तीन टेस्टसाठी निलंबित करण्यात आले होते. पण त्यानंतरच्या सुनावणी नंतर हरभजन सिंग वरील निलंबन हटविण्यात आले होते.
न्यूझीलंडचे न्यायमूर्ती जॉन हॅसन यांनी केलेल्या सुनावणीत तेंडुलकर साक्षीदार म्हणून उपस्थित होता. त्यावेळी सचिनने हरभजन सिंगच्या बाजूने साक्ष दिली होती.
या प्रकरणात तेंडुलकरच्या भूमिकेवर केवळ पॉटिंगने आक्षेप घेतला नाही तर, माजी विकेटकीपर गिलख्रिस्टने पाच वर्षापूर्वी त्याच्या आत्मचरित्रातही असा आरोप सचिन वर केला होता. या घटनेनंतर हरभजनला केवळ दंड करण्यात आला होता. या घटनेने दोन्ही देशातील संबंध खराब होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली होती.‘डेली टेलिग्राफ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमी नुसार पॉटिंग म्हटला की, प्रशासकीय चूक म्हणून न्यायाधिशांना हरभजनच्या मागील अपराधांबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याला जी शिक्षा व्हायला हवी होती, ती झाली नाही. आणि तसेही २१ व्या शतकात भारतीय क्रिकेटचे वर्चस्व इतके वाढले होती की त्यांना कुणीही हात लावू शकत नव्हतं. भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांच्या वक्तव्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाची प्रतिमा खराब झाली होती. कुबळेनि म्हटले होते कि, ऑस्ट्रेलिया संघ खेळ भावनने खेळला नाही.