शिवसेनेतील बंडखोर नेते




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Rebellious Leaders of Shivsena, On 19 June 1966, Thackeray founded the Shivsena as a political organization. At the time of its foundation,

shivasena

मनोहर जोशींना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतावं लागल. पण असा अपमान सहन करणारे शिवसेनेत ते एकटेच नेते नाहीत, या आधीही बर्याच नेत्यांना या प्रकारच्या अपमानाला सामोरे जावे लागले.
१९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना बीजेपी युतीची सत्ता आल्यानंतर मनोहर जोशींना याच शिवाजी पार्क वर मुख्यमंत्री बनविण्यात आल. आणि आज त्याच शिवाजी पार्क वरून त्यांना अपमानित होऊन घरी परतावं लागल. याधीही शिवसेनेच्या अनेक नेत्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यापैकी काहींनी मग शिवसेना सोडून वेगळ्या पक्षात जाने पसंत केले तर काहींनी आपला नवीन पक्ष स्तापन केला.
१) शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोंबर १९६६- दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेबांच्या मांडीला मंदी लाऊन बसलेले अॅडव्होकेट बळवंत मंत्री यांना १९६७ साली शिवसेना सोडावी लागली. शिवसेनेत लोकशाही असावी म्हणून त्यांचा वाद झाला. त्यातून त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली.
२) भारतीय कामगार सेनेचे प्रमुख अरुण मेहता – यानाही अंतर्गत बंडखोरीमुळे शिवसेना सोडावी लागली. नंतर ते कॉंग्रेस मध्ये शामिल झाले.
३) बंडू शिंगरे – १९७४ सालच्या लोकसभा पोट निवडणुकीत रामराव आदिक यांना पाठींबा देण्याच्या मुद्यावरून त्यांचा वाद झाला व त्यांनी शिवसेना सोडली. नंतर त्यांनी १९७५ मध्ये प्रती शिवसेनाही स्तापन केली.
४) डॉ. हेमचंद्र गुप्ते – १९७७ सालच्या महापौरपदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार मुरली देवरा यांना पाठिंबा जाहीर केला हि बाब शिवसेनेचे पहिले महापौर डॉ हेमचंद्र गुप्ते यांना खटकली म्हणून त्यांनी हि शिवसेनेला रामराम ठोकला.
५) दत्ता प्रधान – बाळासाहेबांचे आणखी एक विश्वासू सहकारी दत्ता प्रधान यांनीही १९७७ साली त्यांनी हि शिवसेनेला रामराम ठीकला.
६) माधव देशपांडे – शिवसेनेत घरानेशीही नांदत असल्याचा आरोप करीत माधव देशपांडे यांनीही शिवसेनेला रामराम ठोकला.
७) छगन भुजबळ – शिवसेनेला सर्वात मोठा धक्का १९९१ साली छगन भुजबळ यांनी दिला. मनोहर जोशींना विरोधी पक्षनेते पद दिल्याच्या कारणावरून त्यांनी शिवसेना सोडली. भूजाबाळणी चक्क १७ आमदारांना सोबत घेऊन शिवसेना सोडली व शिवसेनेत मोठी फूट निर्माण केली. आणि ते शरद पवारांच्या सहयोगाने कॉंग्रेस मध्ये शामिल झाले.
८) नारायण राणे – २००५ साली राणेंनी सुद्धा ७ आमदार सोबत घेऊन शिवसेना सोडली व ते कॉंग्रेस मध्ये शामिल झाले. उद्धव ठाकरेनसोबत झालेल्या मतभेदामुळे त्यांना शिवसेना सोडावी लागली.
त्यानंतर तर शिवसेनेत पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची लाईनच लागली, डॉ रमेश प्रभू, सतीश प्रधान, गणेश नाईक, संजय निरुपम, बाळासाहेब विखे पाटील, सुरेशदादा जैन, गुलाबराव गावंडे, सुरेश नवले, सुबोध मोहिते, तुकाराम रेंगे पाटील, विलास गुंडेवार यांनीहि शिवसेनेला रामराम ठोकला. त्यापैकी सुरेशदादा जैन व गुलाबराव गावंडे हे पुन्हा शिवसेनेत दाखल झाले.
९) राज ठाकरे – २००६ हे वर्ष शिवसेनेसाठी फार कठीण वर्ष ठरले. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनीही २००६ मध्ये शिवसेनेला अखेरचा रामराम ठोकला. ठाकरे कुटुंबातील कुण्या व्यक्तीने शिवसेना सोडण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. उद्धव ठाकरेंशी झालेल्या मतभेदामुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्तपणा केली. आणि आता कदाचित मनोहर जोशी वरही शिवसेना सोडण्याची वेळ आली आहे अस बोलाल जात आहे. पक्ष सोडन हे तर शिवसेनेसाठी काही नव नाही. असे कितीतरी धक्के शिवसेनेनी सहन केले आहे. पण त्या वेळची परिस्तिति हि वेगळी होती. कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे जिवंत होते पण ते आज नाहीत. या सर्वांमुळे तरी शिवसेनेचे मुळे फार कमकुवत झाली आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu