मॉडेल अंजुम नायर ला पोलिस कोठडी
पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणारी मॉडेल अंजुम नायर ला २१ ऑक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी कोर्टाने दिल्यानंतर तिची रवानगी भायखळा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अंजुमने कोर्टात जामिनासाठी केलेल्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तिला किमान दोन दिवस किंवा १४ दिवस तुरुंगात काढावे लागणार आहे.
अंजुमच्या घरात सुरु असलेले कर्नकर्कश आवाज बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तिने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी ओशिविरा पोलिसांनी सोमवारी तिला अटक केली होती. मंगळवारी तिला अंधेरी कोर्टासमोर उभे करण्यात आले. तिच्या वकिलांनी तिच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बांगर यांनी तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.