जिया खान आत्महत्या प्रकरण




Like
Like Love Haha Wow Sad Angry

jiya khan

बॉलिवूडची तरून अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येच्या घटनेचा तपास आता नव्याने सुरु  करावा लागणार आहे. उच्च न्यायालयाने आज एका याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, वरिष्ठ पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यामार्फत नव्याने तपास करावा. तसे उच्च न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले आहेत.
जियाची आई रबिया खान यांनी जिया खानच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी बुधवारी फेटाळून लावली. परंतु रबिया खान यांचा जबाब नव्याने नोंदवण्यात यावा. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यामार्फत नव्याने तपास करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
३ जून रोजी जिया खान हिने आत्महत्या केली होती. अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज पांचोली व जिया यांचे प्रेमसंबध होते. परिणामी पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी सूरजला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली होती. याबाबत जियाच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सीबीआयमार्फत चौकशीची मागणी याचिकेत केली होती.
२६ तारखेपूर्वी जियाच्या आईचा जबाब जुहू ठाण्यात नोंदविण्यात यावा. तिच्या आत्महत्येसंदर्भातील वस्तुस्थिती नव्याने जाणून घ्यावी. आईने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करावा आणि आवश्यकता भासल्यास नवीन कलमांचा समावेश करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Read News About “Jiah Khan suicide Case”.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu