नावात काय आहे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Nawat Kya Ahe Name of the person is very important, is just a identity of the person. this articles tells you why Name is so important for you.

nawat kay thewal ahe

आपण अगदी सहज म्हणतो की ” नावात काय आहे .” नावात काहीच नाही असे आपल्याला वाटतं असतं. पण मला असं वाटतं की या आपल्या नावात खूप काही दडलेलं आहे. आपण शोध घेत नाही तर आपल्याला दडलेला समजणार कसं. आपल्या जन्मानंतर नामकरण विधी झाला की आपणाला त्या नावाने ओळखले जाते अगदी आपल्या मृत्युपर्यंत आणि त्यानंतरही आपले फक्त नाव आणि आपण केलेलं कार्य मागे राहत. म्हणजेच या आपल्या नावात आपल्याला मिळणारं यश – अपयश, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, आणि सर्व नात्यातील आपले स्नेहसंबंध कसे असतील इत्यादी दडलेलं असतं असं मला वाटतं. कारण आपल्या नावातील कंपन ही आपल्याबरोबर असतात. नावातील कंपन जर आपल्याशी जुळत असतील तर पुढील जीवनाची वाटचाल यशस्वी होते. जर नावातील कंपन जुळत नसतील तर जीवनात यश – अपयश, संकटांशी सामना करावा लागतो. आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या नावाची कंपन आपल्या नावातील कंपनाशी जुळली तर नातेसंबंध अधिक दृढ होतात, पण कंपने जुळत नसतील तर मात्र नातेसंबंध नावापुरतेच असतात. अनेक वर्षात भेटीगाठी होत नाहीत किंवा साधे दूरध्वनीवरून बोलणेही होत नाही. म्हणून मला नेहमी वाटतं आलं आहे की आपल्या नावात निश्चीतपणे आपल्या जीवनाचे रहस्य दडलेलं आहे. ते रहस्य, त्यातील बारकावे शोधून जर आपण त्याप्रमाणे मार्गक्रमणा जीवनात ठेवली तर काही गोष्टी साध्य करता जरूर येतील. म्हणूनच मुला – मुलीच्या जन्मानंतर विचार करून नाव ठेवणे योग्य होईल असं माझं मत आहे. हरी ओम.

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, १०१०२०१३.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा