राहुल गांधीनी मुस्लिमांची माफी मागावी- नरेंद्र मोदी
झाशीच्या सभेत नरेंद्र मोदींचे राहुल गांधींवर टीकास्त्र
मुझफ्फरनगर मधील दंगली मागे ‘आयएसआय” चा हात असून त्यांनी तेथील काही मुस्लिम तरुणांना हाताशी धरून घडवून आणली होती, या राहुल गांधींच्या विधानाचा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी झाशी येथे झालेल्या प्रचार सभेत समाचार घेतला. एक तर त्यांची नवे जाहीर करा नाही तर त्यांची माफी मागा, असे थांकौन सांगत मोदिनी मुस्लिम समाजाची बाजू घेतली आहे. तसेच आजीची हत्या केल्याबद्दल शीख समाजातील लोकांविषयी माझ्या मनात राग होता या राहुलच्या विभानाचा हि मोदिनी समाचार घेतला, तसेच कॉंग्रेस च्या मनातही तो राग होताच म्हणूनच तर शीखविरोधी दंगली घडल्या होत्या का, असा प्रश्न हि मोदी यांनी केला आहे. मी येथे आसवे गाळण्यासाठी नाही, तर पुसण्यासाठी आलो आहे, अशी आपल्या भाषणाला सुरवात करणाऱ्या मोदिनी राहुल गांधीनीवर थेट नेम धरला. राहुल गांधीनी आपल्या सभेत गुप्तचर खात्यांनी माहिती दिल्याचा दावा केला होता. त्यावर मोदी म्हणाले कि गुप्तचर खाते एका खासदाराला कोणत्या आधारावर हि माहिती देते.
Read News About “Narendra Modi’s Rally In Jhansi”.