दसरा मेळाव्यात झालेल्या प्रकारानंतर अज्ञातवासात गेलेले मनोहर जोशी आज मुंबई येथे दाखल झाले आहेत. आणि येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी आज स्पष्ट केले कि, मी कोणतीही चूक केलेली नाही, त्यामुळे मला माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी माझ्या वयाची ४५ वर्ष शिवसेनेची सेवा किलेली आहे त्यामुळे आता तरी शिवसेना सोडण्याचा प्रश्न येत नाही असे आज मनोहर जोशींनी स्पष्ट केले आहे.
आज मनोहर जोशींनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपले मत त्यांच्या समोर मांडले आहे. मात्र या पत्रात त्यांनी नेमके काय लिहिले आहे ते मात्र कळू शकलेले नाही. जोशींनी म्हटले कि माझ्या विरोधात कुणीतरी कटकारस्थान केलेले आहे त्यांच्यावर मात्र मी नाराज आहे.