मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Like Like Love Haha Wow Sad Angry मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

madhyapradesh

मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना अशी हि घटना आहे. धार जिह्या मधील या बलवारी गावात एक प्रेमीयुगलानी प्रेमविवाह केल्यानं त्या जोडप्याला गावकऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासणारी शिक्षा दिली आहे.

बलवारी ग्रामपंचायतच्या खोकरिया गावात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मंगळवारी पहाटेच या प्रेमी युगुलाला गावकऱ्यानी पकडून आणून गावाच्या चौकात असलेल्या एका खांबाला बांधलं आणि त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यां दोघांच्या हि या चेहऱ्याला काळं फासलं. एवढ करूनही गावकरी थांबले नाहीत तर त्यांनी, या जोडप्याचे कपडे काढून, त्यांचा संपूर्ण अंगाला काळ फासून त्यांची गावभर धिंड काढली. त्यांच्या कमरेच्या खाली एक थैली बांधून त्या  जोडप्याला चक्क तीन गावांमध्ये फिरवण्यात आलं. विशेष म्हणजे गावातील काही महिलांचा हि या सर्वांमध्ये सहभाग होता.
या सर्वप्रकाराची पोलिसांना कल्पना दिल्यानंतरही त्यांनी या गुन्ह्याची दखल न घेता घडलेल्या प्रकाराकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. पोलिसांत तक्रार करण्यासाठी युवक-युवतीचे कुटुंबीय पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवली गेली नाही. मात्र त्यानंतर त्यांनी या प्रकरणी २० जणांना अटक केली. बलवारी गावचे सरपंच आणि ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories