काही दिवसांपूर्वी मनोहर जोशींनी अनपेक्षितपणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज दसरा मेळाव्यात पाहायला मिळाले. मनोहर जोशी व्यासपीठावर पोहचले तेंव्हा शिवसैनिकांचा त्यांच्याबद्दलचा रोष उफाळून आला. शिवसैनिकांनी त्यांना फार वाईट भाषेत शिवीगाळ केला. त्यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनात इतका रोष होता कि त्यांना व्यासपीठ सोडण्याची नामुष्की ओढावली. एक तर आज मनोहर जोशींना शिवतीर्थावर पोहोचायला उशीर झाला होता.
मनोहर जोशींनी थेट नेतृत्वावर टीका करत स्वत:च्या पायावर स्वतः कुह्रड मारून घेतली. त्यामुळे आज त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.त्यामुळे त्यांच्यावर व्यासपीठ सोडण्याची नामुष्की ओढवली.
मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांच्या त्या वाक्त्याव्यानी मात्र त्याचं स्वतःचाच नेतृत्व वादळात सापडले आहे.याला कारण ठरलयं ते म्हणजे दादरच्या एका कार्यक्रमात मनोहर जोशींनी केलेलं वक्तव्य… ‘बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं, तर एव्हाना स्मारक झालं असतं’ असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच्या नेतृत्वावरच टीका केली होती. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत असलेले कार्यकर्ते आहेत. अगदी सुरवातीपासून ते शिवसेनेत असले तरीहि त्यांच्या नेतृत्वातून आपल्याला शिवसेनेसारखा आक्रमकपणा दिसून आला नाही. शिवसेनाप्रमुखांच्या नंतर जोशीच हे सर्वात जेष्ठ नेते आहेत.