सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार महाराष्ट्राचे लालू प्रसाद यादव असल्याची टीका केलीय. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. आमचं सरकार सत्तेत आल्यावर अजित पवारांना जेलमध्ये टाकणार असल्याचंही वक्तव्य फडणवीसांनी केलंय. तर गोपिनाथ मुंडेंनी अजितदादांना लक्ष्य करीत त्यांना कुठल्या तुरुंगात पाठवायचं हे जनतेनिच ठरवावं. भाजपच्या या खरमरीत टीकेवर राष्ट्रवादीनेही पलटवार केलाय.
या वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रसने सुद्धा प्रतिहल्ला करीत भाजपला चागलेच उत्तर दिले आहे. “महाराष्ट्र म्हणजे बिहार नाही. भाजपमध्ये काहीजण येदुराप्पा बनण्याचं स्वप्न पाहत आहेत… पण आम्ही येदुराप्पा निर्माण होऊ देणार नाही”, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चढवलाय.