नाव – कॅटरीना कैफ (टुर्क़ुओत्ते)
जन्म – १६ जुलै १९८३ (वय ३०)
जन्म गाव – ब्रिटीश होंग कॉंग
राष्ट्रीयत्व – ब्रिटीश
व्यवसाय – अभिनेत्री , मॉडेल ( २००३ ते सध्या )कॅटरीना कैफ चे नाव आज बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींनमध्ये घेतले जाते. बॉलिवूडमधील तिच्या करिअरला नुकतेच तिने दहा वर्ष पूर्ण केले आहे. कॅटरीनाच्या या दहा वर्षाच्या फिल्मी प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख…
आपल्या बॉलिवूडमध्ये प्रत्येकच तरून तरुणी आपल नशिब आजवण्याचा प्रयत्न करीत असतात पण … मात्र, कॅटरीना सारखं यश फारचं थोड्या लोकांना मिळत असत. विशेष म्हणजे कॅटरीना आणि बॉलीवूड मध्ये भाषेची प्रमुख अडचण असतानाही कॅटरीना चे नाव आज पहिल्या तीन अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. आज प्रत्येक आघाडीचा दिग्दर्शक तिला घेऊन सिनेमा करण्यास उत्सुक आहे. यशराज फिल्मसारख्या बॉलिवूडमधील बड्या प्रॉडक्शन हाऊसचे चित्रपट तिच्याकडं चालून येत आहेत.
२००३ मध्ये तिचा ‘बूम’ हा पहिलाच सिनेमा आला तेव्हा ती बॉलिवूडमध्ये तिला एवढं यश मिळेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. पण आज तिने आपलं स्वताच स्थान निर्माण केले आहे. खरं तर तिच्या अभिनयाची अद्याप कसोटी लागली नाही. मात्र, तिच्या सिल्व्हर स्क्रिनवरचा अपिअरन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. बूमच्या अपयशानंतर कॅटरीनाने काही दक्षिणात्य सिनेमात काम केलं होतं. तिथं काही प्रमाणात यश मिळालं मात्र तिचं टार्गेट तर बॉलिवूड होतं. बॉलिवूडमध्ये तिला आपलं स्थान निर्माण करायचं होतं आणि आपल्या पुढच्याच सिनेमातून तिने त्याची चुणूक दाखवून दिली. अभिनेता अक्षय कुमारसोबत तिचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला मात्र पुढे हीच जोडी सुपर हिट ठरली. अक्षयकुमारसाठी तर ती लकी गर्ल ठरली. सलमान, शाहरुख आणि अमीर या बॉलिवूडमधील तीन खानसोबत काम करण्याची प्रत्येक ‘न्यू कमर’अभिनेत्रीची इच्छा असते. कॅटरीना यातही लकी ठरलीय. पण त्यासाठी तिला बॉलीवूड मध्ये दहा वर्ष घालवाली लागली.
सलमान, शाहरुखसोबत काम केल्यानंतर आता ती ‘धूम – थ्री’ मधून अमीर खान सोबत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झालीय आहे. धूममध्ये ती अॅक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. खान सोबतच कॅटरीनाने ऋतिक रोशन, अक्षयकुमार आणि रणबीर कपूरसोबतही चित्रपट केले. ऋतिक रोशनसोबत ती एका नव्या सिनेमात लवकरच झळकणार आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये ऋतिक रोशनबरोबर तिची केमिस्ट्री चांगलीच जमली होती. हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा पहायला मिळणार आहे. कॅटरीना आज ज्या स्थानावर पोहोचलीय आणि ज्या वेगाने ती वाटचाल करतेय ती पाहता तिला थांबवणे तिच्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रींना सध्या तरी शक्य नाही.a पण या सर्वांमध्ये सलमान खांचे योगदान तिने विसरता कामा नये.२००३ बूम
२००४ माल्लीस्वारी (तेलुगु फिल्म)
२००५ सरकार
२००५ मैने प्यार क्यून किया
२००५ अल्लारी पिदुगु ( तेलुगु फिल्म)
२००६ हम को दिवाना कर गये
२००६ बलराम आणि तारादास (मलयालम फिल्म )
२००७ नमस्ते लंडन
२००७ अपने
२००७ पार्टनर
२००७ वेलकम
२००८ रेस
२००८ सिंग इस किंग
२००८ हेल्लो
२००८ युवराज
२००९ न्यू योर्क (Nominated—Filmfare Award for Best Actress )
२००९ ब्लू
२००९ अजब प्रेम कि गजब कहाणी
२००९ दे दना दन
२०१० राजनीती
2010 तीस मार खान
२०११ झीन्द्गी ना मिलेगी दोबारा
२०११ बोडीगार्ड (Special appearance in song “Bodyguard “)
२०११ मेरे ब्रदर कि दुल्हन (Nominated—Filmfare Award for Best Actress )
२०१२ अग्निपथ (Special appearance in song “Chikni Chameli”)
२०१२ एक था टायगर
२०१२ जब तक है जान
२०१३ बॉम्बे टोकीज
२०१३ धूम ३
२०१४ बंग बंग