नुकत्याच कोरिया इथे पार पडलेल्या “मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३” ह्या स्पर्धेत भारताच्या सृष्टी राणानं हा किताब आपल्या नावावर केला आहे…. या स्पर्धेत ४९ स्पर्धेक होते. या ४९ स्पर्धकांमधून सृष्टीची निवड करण्यात आली. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर तिची निवड करण्यात आलेली आहे.
या वेळी बोलताना ती म्हणाली कि हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३ सोबतच ‘बेस्ट नॅशनल कॉस्ट्युम’चा पुरस्कारही सृष्टीनं यावेळी पटकावला आहे.
२१ वर्षीय सृष्टी राणा हा किताब पटकावणारी चौथी भारतीय ठरली आहे. या आधी अभिनेत्री झिनत अमान, दिया मिर्झा आणि हिमांगिनी सिंग यदू यांनी ही स्पर्धा जिंकली होती.