Pune is a sprawling city in the western Indian state of Maharashtra. It was previously the base of the Peshwas (PMs) of the Maratha Empire, which endured from 1674 to 1818. Pune is considered as the social capital of Maharashtra. Pune is one of the Major City of India. This city is specially Known for the IT [Information Technology] Hub. Its main City of Marathi People.
भारतातील महाराष्ट्र राज्य मधील पुणे हे एक अतिशय महत्वाचे असे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. पुणे हे शहर महाराष्ट्राच्या पाच्चीमेला, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनाऱ्यावर बसलेले आहे. पुणे हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे, आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. सार्वजनिक सुख सुविधा आणि विकासाच्या बाबतीत पुण्याचा मुंबई नंतर दुसरा क्रमांक येतो. पुणे शहर शिक्षणाचे माहेघर म्हणूननही ओळखले जाते. म्हणूनच पुण्याला “पूर्वेचे
ऑक्सफोर्ड” म्हणूनही ओळखल्या जाते. पुणे शहरात अनेक प्रौद्योगिकी आणि ऑटोमोबाईल, आई टी कंपन्या सुद्धा आहेत म्हणून त्याला भारताचे ”डेट्राइट” सुद्धा म्हणू शकतो. पुणे शहराचा प्राचीन इतिहास आहे म्हणून पुणे शहर महाराष्ट्र ची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखल्या जाते. पुणे शहरात मराठी भाषा बोलली जाते.
पुणे शहरामध्ये जवळ जवळ सर्वच विषयांवरील उच्च शिक्षनाची सुविधा उपलब्ध आहे. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला, आयुका, आगरकर संशोधन संस्था, सी-डैक जैसी आंतरराष्ट्रीय स्तरांवरील शिक्षण संस्थान पुण्यामध्ये आहेत. पुणे येथील फिल्म इन्स्टिट्युट सुद्धा फार नावाजलेल आहे.
पुणे शहर महाराष्ट्र व भारतातील एक महत्त्वपूर्ण औद्योगिक केंद्र आहे. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, भारत फोर्ज सारखे मोठे उद्योग येथे आहेत. १९९०च्या दशकात इन्फोसिस, टाटा कंसल्टंसी सर्विसे, विप्रो, सिमैंटेक, आइ.बी.एम सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी आपल्या कंपन्या पुणे मध्ये स्टेपन केल्या. आणि पुणे शहर भारतातील एक प्रमुख सूचना प्रौद्योगिकी उद्योगकेंद्र च्या रुपात विकसित झाले.
पुण्याच्या नावाचा इतिहास
पुणे शहर आधी ‘पुण्यनगरी’ या नावानी ओळखले जात असे. पुणे शहर ई.स. ८ च्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) या नावानी ओळखले जायचे, असा संदर्भ आपल्याला इतिहासात मिळतो. ई.स. ११ व्या शतकात ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ या नावानी ओळखले जात असे. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’ ठेवण्यात आले होते. नंतर ब्रिटिश सरकारने या शहराचे नाव ‘पूना’ असे ठेवले होते.आठव्या शतकापर्यंत पुण्याला ” पुन्नक ” या नावानी ओळखले जात असे. इ.स.७५८ मध्ये या शहराचे सर्वात जुने वर्णन आढळते. राष्ट्रकुल राजवटीच्या काळात हा उल्लेख आढळतो. मध्ययुगातील एक प्रमाण म्हणजे जंगली महाराज मार्गावरील पातालेश्वर गुफा हे आहे, टी गुफा आठव्या शताब्दी मधील आहे .
सतराव्या शतकात या शहरावर निजामशहा, आदिलशहा, मुगल या सारख्या विभिन्न राज्यांचे राज्य होते. सतराव्या शतकात निजामशाहाने शहाजीराजे भोसले यांना पुणे शहराची जमीनदारी दिली होती.
त्याच काळात शहाजी राज्यांच्या पत्नींनी जिजाबाई नि ई.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्यावर शिवाजीराजे भोसले यांना जन्म दिला. शिवाजी महाराजांनी आपल्या माळव्यांच्या साथीने पुणे शहरात मराठा साम्राज्या ची स्थापना केली. या काळात पुणे शहरात शिवाजी महाराजांचे वर्चस्व होते. नंतर पेशवा राजवटीत ई.स. १७४९ मध्ये पुणे शहराला मराठा साम्राज्याची ची ‘प्रशासकीय राजधानी’ बनविण्यात आले. पेशवा रावतीत पुण्याचा फारच विकास झाला होता. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.पुणे शहराच्या इतिहासात शिवाजी महाराज्यांच्या जीवनाचे एक महत्वाचे पण जोडल्या गेलेले आहे. ई.स. १६३५-३६ च्या काळात जेंव्हा जिजामाता व शिवाजी महाराज पुणे येथे राहायला आले, तेंव्हापासून पुण्याच्या इतिहासाचा जणू काही नवीन जन्मच झाला आहे. शिवाजी महाराज व जिजामाता पुणे मधील लाल महाल येथे वास्तव्यास होते. पुण्यातील ग्रामदेवता- कसबा गणपती ची स्थापना जिजामतांनी केली आहे.
१७ व्या शतकाच्या सुरवातीला छत्रपती शाहू महाराज्यांचे प्रधानमंत्री बाजीराव पेशवे (थोरले) यांनी पुण्याला आपले स्थाई आवास बनविले. नंतर त्यांनी मुठा नदीच्या किनाऱ्यावर शनिवारवाडा बनविला होता.
पुणे येथील खरडा या ऐतिहासिक किल्ल्यावर मराठा व निजाम यांच्यामध्ये इ.स. १७९५ मध्ये युध्द झाले होते. इ.स. १८१७ पुण्याजवळील खडकी मध्ये ब्रिटिश व मराठा यांच्यामध्ये युध्द झाले होते. मराठ्यांना या युद्धात पराभव पत्करावा लागला होता. ब्रिटिश सरकारने पुण्याचे महत्व समजून घेऊन पुण्यात खडकी कँटोन्मेंट (लष्कर छावनी) ची स्थापना केली. इ.स. 1858 मे पुणे महानगरपालिका स्थापना करण्यात आली.स्वातंत्रा संग्राम
भारतीय स्वातंत्रा संग्रामा मध्ये पुण्यातील नेत्यांचे आणि समाजसुधारकांचे महत्वाचे योगदान आहे. लोकमान्य टिळक आणि सावरकर सारख्या नेत्यांनी आपल्या कार्तुवाने पुण्याचे नाव राष्ट्रीय नकाशावर कोरले आहे. महादेव गोविंद रानडे, रा.ग. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाल कृष्ण गोखले, महात्मा फुले सारखे समाजसुधारक सुद्धा पुण्याचेच आहेत.पुण्यातील महत्वाचे पर्यटन स्थळे
शनिवार वाड़ा
आगाखान महल
पार्वती हिल मंदिर
कटराज सर्प उद्यान
कोणार्क
दगडू शेट
कसबा गणपती
तांबडी जोगेश्वरी
गुरूजी तालीम
तुलशीबाग
केसरी वाडा