पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले भाजपचे नरेंद्र मोदी यांना इशारत जहां बनवत चकमक प्रकरणात गोऊन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चालू असल्याची भीती भाजपने पुन्हा एकदा बोलून दाखविली. नरेंद्र मोदी मंत्री असताना झालेल्या या प्रकरणात दाखल करण्यात येत असलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात इशारत निर्दोष असल्याचा दावा सीबीआय करणार असल्याचे संकेत देण्यात येत आहे. असे जर झाले तर मोदी आणि शहा यांचा इशारत प्रकरणाच्या चौकशीशी संबंध जोडला जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी भाजप श्रेष्टींची झोप उडाली आहे. मोदिनी या आधीच हि शंका बोलून दाखविली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटलीनि सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून अशीच शंका व्यक्त केलेली आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचा राजकीय दृष्ट्या सामना करू शकत नसल्यामुळे सीबीआय च्या मदतीने मोदी आणि भाजपला बदनाम करण्याची कॉंग्रेस ची धडपड सुरु असल्याची शंका नायडू यांनी व्यक्त केली आहे. केंद्रातील सत्ता टिकविण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्या कॉग्रेसने मायावती, मुलायमसिंह यादव आणि द्रमुकच्या नेत्यांची कश्या प्रकारे कोंडी केली याचा पाढाच नायडू यांनी वाचून दाखविला.