मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहार कोर्टाचा वॉरंट




Like
Like Love Haha Wow Sad Angry

raj thackeray

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट काढलेला आहे. त्यांना १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात राहण्याचे या वॉरंटमध्ये म्हटले आहे.
राज ठाकरे यांना १२ नोव्हेंबरपूर्वी मुजफ्फर-पूर्व कोर्टात हजर करा, असा आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे. राज यांच्या विरुद्ध बॉडी वॉरंट म्हणजे जर राज ठाकरे कोर्टात हजर राहिले नाहीत, तर तो कोर्टाचा अपमान समजून त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
१६ नोव्हेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर यातील काही आरोपी बिहारमधून पकडण्यात आले होते. याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सर्व गुन्हेगार बिहारचेच असतात असे म्हटले होते. तसेच त्यांनी बिहारींचा उल्लेख बलात्कारी असाही केला होता.

यापूर्वीही सुद्धा राज ठाकरे यांच्याविरोधात मुजफ्फरपूर कोर्टानेच वॉरंट जारी केलेलं होतं

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu