बीड जिल्हा बॅँक कर्ज थकबाकी प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं त्यांना दणका दिलाय.
धनजंय मुंडे यांनी घेतलेल्या १२ कोटी रुपयाच्या कर्जाचे व्याजाचे एक कोटी रुपये उद्या म्हणजेच मंगळवारी भरण्याचे आदेश कोर्टानं त्यांना दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ तारखेला होणार आहे.
धनंजय मुंडे यांनी २००८ मध्ये ‘आदित्य’ बहुउद्देशीय संस्था बीड, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ डेंटल कॉलेज सोलापूर, व्यंकटेश्वर अँग्रो प्रोडक्ट्स, जय भवानी सहकारी साखर कारखाना, खंड औद्योगिक बहुउद्देशीय संस्था आणि गजानन सहकारी साखर कारखाना या सर्व संस्थेला मिळून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून ३५ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज तत्कालीन संचालकांनी मंजूर केले होते. मात्र, हे कर्जमुदतीत बँकेत भरले गेले नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सदर कर्जांच्या कागदपत्रांची खातरजमा केली असता हे सर्व कर्ज विनातारण आणि बोगस कागदपत्रांच्या आधावर देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.