पुन्हा एक घोटाळा
राज्यातील ४० साखर कारखाने गेल्या आठ वर्षात तोट्यात आणून ते कवडीमोल भावाने राजकीय नेते व त्यांच्या नातलगाशी संबंधित असलेल्या कंपन्यांनी खरेदी केले आहेत. आणि त्यामध्ये १० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. साखर कारखाने तोट्यात आणून ते आपल्या कंपन्यांच्या ताब्यात घेण्याच्या या व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर असून त्यांच्याशी संबंधित कंपन्यांनी सर्वाधिक सहा कारखाने विकत घेतल्याचा आरोप अण्णा हजारेनी केला आहे. त्यानंतर अन्य राजकीय नेत्यांमध्ये नितीन गडकरी, फौजिया खान, विनय कोरे आदींचा समावेश आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या काळात आणखी ६० कार्ळणे तोट्यात आणून आपल्याच खाजगी कंपन्यांना विकण्याचा डाव राजकीय नेत्यांनी आखल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्याच्या अद्याक्षतेखालील समितीने कारखान्यांची विक्री न करता ते भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही लातूर सहकारी कारखान्याची विक्री झाली याकडे हि अण्णा हजारे यांनी लक्ष वेधले आहे.