आधार ला वैधानिक दर्जा – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
कोणताही कायदेशीर आधार नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात तोंडघशी पडलेल्या केंद्र सरकारने आधार कार्ड ला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता आधार कार्डला आता कायदेशीर दर्जा मिळाला आहे. मात्र आधार कार्ड हि स्वेचा सुविधा आहे व त्याची सक्ती कुणावरही केली जाणार नाही, असेही या विधेयकात म्हटले गेले आहे. हे विधेयक मंत्रिमंडळाने काही दुरुस्त्या करून मंजूर केले आहे. आता हे विधेयक राज्यसभेपुढे जाणार असून, तेथे त्यावर चर्चा करून ते हिवाळी अधिवेशनात मंजूर होण्याची अपेक्षा आहे. सध्या काही मंत्रालये व राज्य तसेच विभाग अनुदानाची रक्कम वितरीत करताना आदर कार्ड क्रमांक असलेल्यांच्या खात्यात हि रक्कम जमा करत आहे.