आता घुगारांचे बोल गुंजणार भारत – पाक सीमेवर
ज्या सीमेवर सदैव गोळीबार आणि तोफांचा आवाज नांदत असतो त्याच सीमेवर येत्या १५ ऑक्टोंबर रोजी मराठमोळ्या लावणीचे सूर आणि घुंगरांचा नाद उमटणार आहे. भारत-पाक सीमेवरील उरी आणि बारामुल्ला येथील नियंत्रण सीमेवर हा लावण्यांचा फड रंगणार आहे. २४ तास नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवणाऱ्या जवानांसाठी १२ मराठमोळ्या अभिनेत्रींचा मेल इथे जमणार आहे. केंद्र सरकारने अशा कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच परवानगी दिली आहे. दिग्दर्शक महेश टिकेकर यांच्या “मराठी तारका” या कार्यक्रमाचे यापूर्वी देशविदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. राष्ट्रपती भावनाठी त्यांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे. परंतु प्रत्यक्ष सीमेवर मराठमोळ्या लावण्या होण्याची हि पहिलीच वेळ आहे. या कार्यक्रमासाठी सरकारने त्यांना कडक सुरक्षा पुरिवल्यचि माहिती टिकेकर यांनी दिली आहे.