ललित मोदीवर आजीवन बंदी




Lalit Modi

नवी दिल्ली,  – ललित मोदीवर आजीवन बंदी

आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे.आणि त्याना यापुढे कधीही भारतीय क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचे पद भूषवता येणार नाही असे सुद्धा  आज स्पष्ट करण्यात आले आहे. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोप असलेले मोदी भारतीय क्रिकेटविश्वाबाहेर फेकले गेले आहे.
आयपीएल यशस्वी करणार्या मोदिनी आयपीएलचा कारभार मनमानीपणे केला, फ्रँचाइजींना आपल्या मनाप्रमाणे वागण्यास धमकावले, त्यानी बीसीसीयचे करोडो रुपयांचे नुकसान करणारे निर्णय घेतले असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवले गेलेले होते. या सगळ्या आरोपांमध्ये ते दोषी असल्याचे आज सिद्ध झाले. आज विशेष समितीने सादर केलेल्या १३३ पानांच्या अहवालात हा निर्णय घेण्यात आला. कितीही धनाढ्य आणि शक्तिमान व्यक्ती असेल तरी तो क्रिकेटच्या विश्वात हवं तसं वागू शकणार नाही असा संदेश या कारवाईतून बीसीसीआय ने दिला गेल्याचे बोलले जात आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड