लिहिण्यात आनंद मिळत असतो




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Witting is the best job of the world and We Get Happiness from Writing. what we write is read by others. always write that useful for others. this article is By Pradeep Kelkar, Maharshtra.
लिहू वाचू आनंदे…
joy of writing

लिहिण्यात आनंद मिळत असतो आपल्या मनाला. या मिळणा-या आनंदाची अनुभूती लिहिल्याशिवाय कशी येणार. म्हणून आपल्या मनात जे विचार येतात ते विचार अत्यंत सोप्या शब्दात – भाषेत आपल्या जवळील कागदावर लिहा नी वाचा. जरूर तर पुन्हा एकदा वाचा. काही चुकीचे वाटले तर सुधारा. मनाला आनंद जाहला की आपले विचार फेसबुक वरील खात्यात आम्हाला वाचण्यासाठी प्रकाशित करा. आम्हाला आपले विचार वाचून आनंद घेऊ द्या की. कारण लिहिण्यात जसा आनंद असतो तसाच आनंद वाचतांनाही होत असतो. काहीही लिहा, कुठलाही विषय असू द्या. तुम्ही लिहितांना आनंद घ्या आणि वाचतांना आम्हाला आनंद द्या. मला खात्री आहे की आपण निश्चितपणे लिहिण्यात यशस्वी व्हाल. मात्र प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे. मीही लिहित असतांना चुका होत होत्या, अजूनही चुका होत असतात. पण लिहिणे सोडवायचे नाही. जिथे उमजते चुकीचे ते लक्षात ठेऊन पुढील विचार लिहितांना काळजी घ्यावयाची इतकेच मी अवश्य सांगेन. ज्यांना लिहिता येत नाही असे वाटते त्यांनी या श्री गणरायाच्या साक्षीने लिहिण्यास आजच सुरुवात करावी. राजेंद्र गाडगीळ यांनी माझे नव्याने नामकरण केले ” झरणी आजोबा “. खरंच सुंदर नाव आहे. आवडले अगदी मनापासून. हरी ओम.

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, १००९२०१३.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu