राज्यातल्या मदरशांना सुमारे 1o कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तेव्हा मदरशांना १o कोटी रुपये, तर वारकरी शिक्षण संस्थांना १oo कोटी रुपये देण्याची वारकरी संप्रदायाची शासनाकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील मदशांना १o कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. याचबरोबर राज्यात वारकरी संप्रदायही जनप्रबोधनाच्या माध्यमांतून महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे. त्यामुळे मदरश्यांप्रमाणेच वारकरी शिक्षण संस्थांना शासनाने १oo कोटी रुपयांचे अनुदान तात्काळ घोषित करावे, अशी मागणी श्रीवारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज यांनी केली आहे.