अभिनेता शशांक केतकर
छोट्या पडद्यावरील फ्रेश चेहरा म्हणजे शशांक केतकर. दोन- तीन मलिकांमधून छोटी मोठी कामे केल्यानंतर ‘होणार सून मी या घराची’ या मालिकेद्वारे लोकांच्या मनात स्थान मिळवनार्या शशांकने अभिनेयाक्षेत्रात पाऊल टाकण्या आधी ऑस्ट्रेलियाहून मास्टर ऑफ इंजिनियरींग मॅनेजमेंट पूर्ण केले आहे. आणि तो राष्ट्रीय स्तरावरील स्विमिंग चाम्पियन सुद्धा अहे. आणि त्याला फोटोग्राफीची देखील खूप आवड आहे.
शशांकने ‘पूर्णविराम’ नावाच्या नाटका पासून आपल्या करीयरची सुरुवात केली. त्यानंतर त्याची पहिली टी. व्ही. सिरियल ‘कालाय तस्मै नमः’ ही आहे. यात त्याने अभिनेते विक्रम गोखले यांच्या नातवाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने महेश कोठारे यांच्या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ या सिरियलमध्ये छोटासा रोल सुद्धा केला होता. ‘सुवासिनी’सिरियल शशांकसाठी मोठा ब्रेक ठरला. यामध्ये त्याने जयरामचा म्हणजे म्हणजे तुषार दळवी यांच्या मुलाचा रोल केला होता. त्यानंतर त्याने ‘स्वप्नांच्या पलीकडले’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या दोन मालिकादेखील केल्या आहेत.
Marathi Actor Sashank Ketkar a new generation actor of Marathi Movie Industry. check his wallpapers and information about his work. latest picture shoot of Sashank Ketkar.