२०१४ च्या निवडणुकीत ज्या पक्षाला १८० जागा मिळेल तोच पक्ष यावेळी सरकार स्तापन करेल अस भाकित शरद पवार यानि केलेल आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत होणार असली तरीही त्यात प्रादेशिक पक्षच महत्वाची भूमिका बजवानार असल्याचं शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे पुढचं सरकार कोणाचं असेल यावर प्रादेशिक पातळीवरच्या नेत्यांचा फार मोठा वाटा असेल असं पवार म्हणालेत.
भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींची घोषणा केली असली तरीही त्याचा फारसा फायदा भाजपला होणार नाही असंही पवार म्हणालेत. पवारांचं म्हणणं आहे की आघाडी आणि युतीच्या राजकारणात पंतप्रधान पदाचा उमेदवार असा असावा की ज्याला सर्व प्रादेशिक पक्षांनी स्वीकारलेलं असेल. पवार म्हणाले, “माझ्या मते लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी, मुलायम सिंह, मायावती, नवीन पटनायक, नीतीश कुमार आणि जयललिता यांची भूमिका महत्त्वाची असेल”. शिवाय आपण काँग्रेस सोबतच आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.