संत कबीर
जन्म : १४४० (प्रतापघर)
मृत्यू : १५१८ (मघर)कशी शेत्रात राहणाऱ्या एका मुसलमानाच्या जोडप्यास समुद्राच्या लाटांवर मिळालेल्या पेटीत सापडलेले मुल म्हणजे संत कबीर. निरुच निमा या जोडप्यास एकही मुल नव्हते. म्हणून त्यांनीच त्याचा सांभाळ केला. पुढे कबीर मोठा झाल्यावर विणकाम करू लागला. काम करीत असताना तो देवाची भक्ती करीत असे, भजने,दोहे गात असे. देवावर त्याची गाढ श्रद्धा होती. एकदा त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळेना, त्यावेळी एक भिकारी त्याकला वस्त्र नसल्यामुळे शालू मागत होता. कबीरांनी विणलेला शालू जो बाजारात विकायला न्यायचा होता तो शालू भिकाऱ्याला देऊन टाकला. कबिरांना गुरु कोणाला म्हणावे ते समजत नव्हते. नंतर ते काशी मध्ये आलेल्या साधू रामानंद यांचे शिष्य बनले.
पुढे ते रामानदाच्या संगतीत राहिले. मुसलमान व हिंदुना राम व रहिम ऐक्याची भावना प्रकट केली व उपदेश करीत करीत ते भारतभर फिरले. त्यांचे दोहे अतिशय उच्च प्रतीचे होते. समाजाला समजेल अशा शब्दात त्यांनी उपदेश केला. देवाची आराधना आपल्या मार्गाने दुसऱ्याला त्रास न देत करावी, देव एकाच आहे असे ते सांगत. त्यांच्या एका डोहात म्हटले आहे कि, “सहज मिले ओ पाणी है भाई, मागनेसे मिले ओ दुध है, खीच के ले तो खून है ” अशा परखड शब्दात आपला उपदेश त्यांनी जनतेला दिला.Sant Kabir Das Life Essay in Marathi: Kabīr was a mystic poet and saint of India, whose writings have greatly influenced the Bhakti movement.
1 Comment. Leave new
Really nice!!!!!