संत गाडगेबाबा




संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा
जन्म : इ. स. १८७६
मृत्यू  : २० नोवेंबर १९५६
जन्मगाव : त्रुनमोचन ( विदर्भ)

स्वताच्या आयुष्यात आलेल्या खडतर जीवनाचा अनुभव इतरांच्या आयुष्यात येऊ नये यासाठी आयुष्यभर लोकांना उपदेश करणारे गाडगेबाबा स्वच्छतेचे आग्रही होते. लहानपणापासून त्यांनी निरीक्षण करून आपल्या आजूबाजूचे दुख:, दैन्य, दारिद्र्य यांचा सखोल अभ्यास केला. पुढे जीवनभर समाजाची घाण, कचरा काढून पोट भरले व इतर वेळेला समाजाला शहाणे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
त्या काळात असलेली परकीय सत्ता व सावकारीचे बलशाली पाश गोरगरिबांच्या नरडीचा घोट घेत होते. सर्वसामान्य समाज कर्जबाजारी बनला होता. अशा काळात लोकांना शिकून सावरून शहाणे व्हा, कर्ज काढून जत्रा, लागणे करू नका, मूर्तीवर आवाजवी खर्च करू नका, गोर्गारीबना मदत करा, एकमेकास शिव्याशाप देऊ नका, प्राणीमात्रावर द्या करा, अशा प्रकारचा ते उपदेश करीत असत. त्यांच्या कीर्तनाची पद्धत वेगळीच असे. लोकांना प्रश्न विचारून त्यांचे उत्तरही लोकांना सांगण्यास सांगत. त्यांची चूक लक्षात आणून देत असत व त्यावर मार्ग कसा काढायचा यावर मार्मिक उत्तर देत असत.
अशा प्रकारे समाजउद्धारक गाडगे बाबा स्वातंत्र्य युद्धात गांधीजींना भेटले. त्यांनी समाजात असलेल्या वाईट चालीरीती बंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणूनच आजही लोक त्यांना संत गाडगेबाबा म्हणून संबोधतात.

Debuji Zhingraji Janorkar (February 23, 1876 – December 20, 1956) popularly known as Sant Gadge Maharaj or Gadge Baba (Hindi: गाडगे बाबा) . get full details about Sant Gadge Baba Maharaj .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
307641




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड