Life is very long, and each and every moment of the life is very crucial, we need to learn and earn on this earth. simplify your life with unwanted factors. Sansar Watikeltil Watchal.
अत: उचित म्हणजे मनुष्याने इंद्रियांना विषयविकारात संयम ठेवून त्यांना ईश्वर चिंतनात लावावे. य़ाच संदर्भात एक दृष्टांत दर्शविला आहे. — की एक चक्रवती सम्राट होता. एकवेळ त्यांनी आपल्या राज्यात घोषणा केली. जो मनुष्य उद्या माझे दर्शन करेल त्यालाच मी युवराज पद देणार. मी ज्या बाग- बगीच्याच्या कोठी मध्ये निवास करतो ती उद्याला दिवसभर सर्वांसाठी उघडण्यात येईल. त्या बगीच्यात फिरण्यासाठी दोन तासाचा अवधी राहील. परंतु दोन तासाच्या जास्त वेळ कुणासही मिळणार नाही. मात्र बगीच्यातून माझ्या पर्यंत पोचण्यास फक्त एक मिनिटाचा अवधी लागतो. कारण तेथील रस्ते एकदम सुगम आहेत. परंतु नियमा नुसार वेळेत जो माझे दर्शन घेईल त्यालाच युवराज पद प्राप्त होईल. आणि जो बगीच्यात दोन तासाच्या जास्त रमेल त्याला तेथून धक्के देऊन बाहेर काढण्यात येईल. हि घोषणा सर्वत्र करण्यात आली.
मग काय सांगायला हव जवळ जवळ सर्वच लोक प्रात:काळी उठून बगीच्यात अगदी प्रसन्न चित्ताने धडाधड प्रवेश करू लागले. बगीच्याच्या प्रवेश द्वारावर प्रबंधकारीचे निवासस्थान होते. प्रबंधक प्रत्येकाला तिकीट देऊन त्याची एक प्रत आपल्याकडे ठेवून प्रवेशास सुरवात करण्यास सांगत असे. लोक बगीच्यात प्रवेश करू लागले. काही लोक बगीच्यात नाना प्रकारचे चमेली, केवडा, गुलाब या फुलांच्या मोहक सुंदर,तसेच शीतल असा मंद आस्वादात सैर करू लागले. काही लोक त्याच्या पुढील भागात सिनेमा घर, सर्कस, खेळ, तमाशा-विहार, तर कोणी रत्नाच्या ढिगार्यात, सोने-चांदीच्या शिक्क्याच्या ढिगार्यात आणि कधी न पाहिलेल्या अश्या नाना प्रकारच्या पदार्थात,तर वस्तू बघण्यात व अनुभवण्यात दंग झालेत. काही लोक त्याच्याही पुढील भागात फुलांच्या अंथरलेल्या शय्यां असलेल्या दिवाणांवर झोपण्यात व आराम करण्यात मग्न झालेत. काही लोक त्याही पुढील भागात असलेल्या रेकार्डिंग, रेडिओ, ग्रामोफोन, डीजे यावरील गाणे ऎकण्यात येवढे मंत्रमुग्ध होऊन गेलेत. या प्रमाणे लोक त्या बगीच्याच्या सौंदर्यात येवढे तल्लीन होऊन बसले कि राजाच्या दर्शनाची गोष्टच विसरून गेलेत. काही लोकांच्या लक्षात असूनही ते म्हणत कि पहिले हे सर्व भोगूनच राजाचे दर्शन घेऊ. पण मात्र एक व्यक्ती असा विरक्त होता कि त्याचे मन आणि इंद्रिय त्याच्या वश मध्ये असल्या कारणाने त्याने या सर्व सुखांना व सुंदरतेच्या सौंदर्यात न भूलता सर्व वस्तूंचा तिरस्कार करून महाराज्यांच्या दिवान खाण्यात त्यांच्या दर्शनास पोचला आणि त्यालाच युवराज पद प्राप्त झाले.
बगीच्यातील प्रबंधका व्यतिरिक्त तेथे बरेच शिपाई त्या बगीच्यात अस्तित्वात असल्याने त्यांनी दोन तासां च्यावरून वेळ घेणार्यांना त्यांचे तिकीट वापस घेऊन त्यांना धक्के मारून बगिच्या बाहेर काढण्यात आले. तरी काही लोक बळजबरीने तेथे केलेला धन संचय नेता यावा म्हणून गठ्ठे बांधण्याच्या कोशिश मध्ये लागलेले होते. पण ते त्यांच्या हातून हिसकावून घेण्यात येत होते. जेवढे तुम्ही फळ खाल्ले. पदार्थ खाल्ले, सुख,एषोआराम भोगलात हेच खूप झाले असे म्हणत तेथील शिपाई त्या लोकांच्या हातील बांधलेले संचयाचे गठ्ठे हिसकावून त्यांना फटके देत बगीच्याच्या बाहेर काढून हाकलू लागलेत.
काही लोक तमाशा, सिनेमा, डान्स वै. बघत होते ते तर उठायला तयारच नव्हते. परंतु त्याठिकाणी एक मिनिट सुद्धा जास्त वेळ घेता येत नव्हते. हाच नियम बंधनकारक होता. शिपाई सांगत होते मूर्ख लोकांनो हे दृश्य फक्त बघण्याचे आहे,हे धन दौलत बघण्यासाठीच आहे,येथील एक रुपया सुद्धा कुणालाच सोबत नेता येणार नाही, यात वेळ घालवू नका राजाच्या दर्शनाला निघा पण त्यांचे म्हणणे ऐकायला कुणीच तयार नव्हते. लोक त्यांच्या कडे दुर्लक्ष करून मन मानेल त्याप्रमाणे वागत. म्हणून वेळेनुसार तेथील शिपाई धक्के मारून एकेकाला बाहेर काढत होते. काही लोकांनी तेथील रत्नांच्या, रुपयाच्या, सोने-चांदी शिक्क्याच्या गाठोड्या बांधलेल्या ते सोडायला तयार नव्हते परंतु नियम माहिती असून देखील ते मूढमती मूर्ख लोक धनमोहात पडून संच करण्यात मुग्ध झालेले दिसत, त्यांच्या जवळील ते गाठोडे शिपाई हिसकावून घेत त्यांची पिटाई करीत होते. या प्रमाणे प्रत्येक ठिकाणच्या लोकांचा तेथील शिपायांनी ज्या प्रमाणे अवधी समाप्त होत होता त्या प्रमाणे त्यांना बाहेर काढण्यात आले. (हा एक काल्पनिक दृशांत आहे. यावरून येथील चक्रवर्ती राजा म्हणजे दुसरा कुणीही नसून प्रभू परमेश्वर होय. बगिचा म्हणजे हि संसार वाटिका राजाची धोषणा म्हणजे श्रुती-शास्त्र, अध्यात्मिक ज्ञान, दोन घनते म्हणजे मनुष्याचे आयुष्य, राजाच्या दर्शनाला कुणाचेही बंधन नसते, ईश्वर प्राप्तीत सर्वांना स्वतंत्रताच असते. आणि युवराज पद हे स्वर्गद्वाराची परम नि:श्रेय अशी प्राप्ती होय. सुलभ व सुगम अश्या रस्त्यातून थोड्याश्या वेळेचा भक्ती मार्ग पत्करून उच्च कोटीच्या साधनेतून ईश्वर साक्षात्कार प्राप्त होऊ शकतो.
प्रबन्धकर्ता हा धर्मराज तिकीट देऊन त्याची एक प्रत आपल्या कडे ठेवतो म्हणजे आपल्या कर्माचा लेखा जोखा होय. बगीच्यातील प्रवेश व बाहेर येणे हे म्हणजेच जन्म-मृत्यू तुमच्या आतील कर्मा नुसार मिळते. बगीच्यात प्रवेश केल्या नंतर तुमचे पाच इंद्रिय काय करू शकतात,ते आपल्या वश मध्ये कितपत आहे हेच ठरविल्या जाते.
पुष्पांच्या सुगंधता विहार मध्ये रममाण होणे म्हणजे नासिका इंद्रियां वरील वशीकरण सुटून वेळ बरबाद करणे होय. जो पदार्थ, मेवा-मिठाई, फळ या आस्वादात गुंतून पडणे म्हणजेच जीभेवरील वश संपला असे होय. जो तमाशा,सिनेमा अनावश्यक दृश्य, पाहण्यात दंग होणे म्हणजेच नेत्रां वरील वश सुटले हेच समजण्यात येते. तसेच बगीच्यात पुष्पांच्या शय्या वर निद्रा ,किंवा विहार म्हणजेच स्पर्श-त्वचा या इंद्रीयावरील वश गमावून बसने व शरीर नाशिवंत बनविणे,जीवन नष्ट करणे होय. रेडीओ, गाणे एकने डान्स करणे म्हणजेच कर्ण म्हणजे कानावरील वश सुटण्या सारखेच आहे. मनुष्याने विषय रसात रिची घेऊन जीवनातील अमुल्य वेळ नष्ट करणे होय. राजाचे दर्शन न करताच सर्वांना बाहेर धक्के मारून काढणे म्हणजे , मनुष्यात परमेश्वरावरील श्रद्धा नसून साधन विषय अकर्मण्यता होय आणि राज्या जवळ जाणारा मन इंद्रियांवर संयम ठेवून विरक्त पुरुषच जावू शकतो. तोच परम साक्षात्कारी सिद्धी प्राप्त करण्या योग्य उच्च कोटीचा साधक बगीच्यात रममाण न होता राजाचे दर्शनाच्या ओढीने परमपदाची प्राप्ती करून घेतो.
बगिच्याच्या बाहेर काढणे म्हणजेच यमराज च्या स्वाधीन करणे होय. बगीच्यात, रत्न मोहरांचे गाठोडे बांधणारे हे जीवनभर दुसर्यांना फसवून धन रुपया जोडणारे लोभी व भोगी लोक शिपायांचे दंडे व धक्के खाणारे होत. यांची शेवट पर्यंत मरणाची इच्छा नसते, म्हणून बलपूर्वक यांना मरणाच्या स्वाधीन करण्यात येते. बगीच्यातील मेवा, फळ, मोती, रुपया नेता येणार नाही, हे सर्वांनाच माहिती असूनही गाठोडे बांधण्यात वेळ नष्ट करणारेच लोक बारंबार जन्म -मृत्युच्या जाळ्यात फसतात.
या जन्मात कुणीही आपल्या सोबतीला येणार नाही धन, स्त्री, पुत्र सर्व सोडून जायचे आहे. याकरीता हे नाशवंत क्षणभंगुर -पदार्थां वरील व विषय-विकारा वरील मन दूर करून आपले मन व इंद्रिये वैराग्यपूर्वक ईश्वर-भक्तीत लावले पाहिजे. यात मनुष्य जीवनाचे कल्याण आहे.
Reasons of happy life: Sansar Watikeltil Watchal.