संत रामदास स्वामी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
591

संत रामदास स्वामी

संत रामदास स्वामी
जन्म : इ. स. १६०८ जांभ (मराठवाडा)
समाधी : इ. स. १६८२ सज्जनगड (सातारा)

श्री समर्थ रामदास स्वामी हे संत म्हणून गणले जात असले तरी इतर भागवत परंपरेच्या संतापेक्षा त्यांची भूमिका अगदीच वेगळी होती. संसाराविषयी उदासीन राहून केवळ देवाच्या उपसानेतच दंग होऊन राहावे हा इतरांचा मार्ग रामादासना नापसंत होता. आधी प्रपंच नेटका करून मग परमार्थ साधला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. उदंड राजकारण करावे, अखंड सावधपण असावे, असे त्यांनी वारंवार सांगितले. वीर मारुतीची उपासना करावी, बंदिखाण्यातून देवाची मुक्तता करणाऱ्या कोंददधारी राघवाचा ध्यास घ्यावा असे त्यांचे ध्येय होते.
रामदासांचे चरित्रच आगळे होते. लग्नप्रसंगी “सावधान” शब्द ऐकताच ते पळून गेले. नाशिकला टाकळी येथे गेले. सर्ववेळ समाजापासून बाजूला राहून विद्येची उपासना केली. बलोपासना केली व बारा वर्षानंतर वैराग्याधारी, ब्रम्हचारी रामदास तीर्थयात्रेस गेले व संपूर्ण भारतभर तीर्थाटन केले. त्यांनी समाजाची दयनीय स्तिती, अत्याचार, धर्मभोळेपणा, लाचारी यांचा वैताग आला होता. म्हणून त्यांनी समाजाला जागे करण्यासाठी रामभक्तीचे धडे देण्यास सुरवात केली. शिष्यगण गोळा केला. “दासबोध” सारखा महान ग्रंथ लिहिला, मनाचे श्लोक, रामायणे, असे लिखाण केले, रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय सल्लागार होते. अनेक ठिकाणी त्यांनी मारुतीचे मंदिर स्थापन केले. आजही बहुतांशी खेड्यात हि मंदिरे आढळून येतात.

Samarth Ramdas had many disciples.Kalyan Swami worked as a writer for Ramdas, recording his songs and prayers. iography of Samartha Ramdas by Sri Swami Sivanandaji Maharaj

Like
Like Love Haha Wow Sad Angry
591




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu