राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज
जन्म : ३० एप्रिल १९०९ यावली (विदर्भ)
मृत्यू : ११ ऑक्टोंबर १९६८ नागपूर
नाव : माणिक बंधुजी इंगळेसमाज शिक्षण हे ध्येय कायम डोळ्यासमोर ठेऊन समाजाला जागृत करणारे तुकडोजी महाराज हे आयुष्यभर विद्या उपासनेचे काम करीत होते. समाजाला शिकून शहाणे करावे, स्त्री पुरुष असा भेदभाव न मानता मानव इथून तिथून एकाच आहे.असा भावनेचा उपदेश त्यांनी केला. समाजातील अंधश्रद्धा, रोगराई, धर्मभेद, जातपात, अन्याय, अत्याचार हा दूर केल्याशिवाय समाजरूपी रोपटे बहरून येणार नाही. असे त्यांचे मत होते. असे आपले मत इतरांना पटवून देण्यासाठी भजन कीर्तनाच्या माध्यमातून तुकदोजि९ महाराजांनी समाज जागृती केली.
” जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा ” असे आपले म्हणणे त्यांनी कृतीतून पटवून दिले. गावातील रोगराई हटविण्यासाठी प्रथम गाव स्वच्च केला पाहिजे त्याशिवाय रोगराई हटणार नाही. जातीभेद टाळल्याशिवाय मानवतावादी जीवन जगता येणार नाही. स्त्री पुरुष दोघे हि साक्षर झाल्याशिवाय समाज सुधारणार नाही. त्यासाठी सर्वांनी शिकून शहाणे व्हा. असा उपदेश तुकडोजी महाराजांनी केला.
आपला उपदेश लोकांच्या भाषेत लोकांना समजेल अशा मधुर वाणीने, भजन, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी समाजाला सांगितला व समाज जागृती करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व काळ कार्माग्न राहिले.
Rashtra Sant Tukdoji Maharaj went with His mission to help the affected and organised constructive relief works. All about Rashtra Sant Shri Tukdoji Maharaj.
1 Comment. Leave new
😌