राजमाता जिजाबाई
जन्म : १२ जानेवारी १५९८
समाधी : जून १६७४स्वताच्या कर्तुत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य कीर्तिमंत ठरले अशा नामवंत स्त्रिया पुष्कळ आहेत. पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्षे गाजत राहिली अशी भाग्यवती म्हणजे राजमाता जिजाबाई. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आई. जिजाबाई ह्या सरदार लखुजी जाधवांची कन्या. शिंदखेडचे जाधवराव निजामशहाच्या पदरी मोठे मात्तबर सरदार होते. तर वेरुळचे मालोजी भोसले यांचा शहाजी हा मोठा तल्लख दिसणारा मुलगा. जिजाबाईच्या मनात लहानपनिचाच शहाजी भरून राहिलेला. पण मालोजी व लखुजी जाधवांचे वैर. परंतु खुद्द निजामशाहान जाधवरावला हि सोयरिक करण्यास सांगितले व त्यांचे लग्न झाले.
जिजाबाई फारच समजूतदार. लग्नानंतर मुलगी माहेरची नसतेच, तीच खर घर तीच सासरच असायल हव, हे जाणून तिने माहेरचा जन्माचा विरोध पत्करला. जिजाबाईच्या पोटी १६२७ साली शिवाजी राजांचा जन्म शिवनेरीवर झाला. शहाजीराजांनी जिजाबाई व शिवबा यांना पुण्याच्या जहागीराकडे पाठवले व दादाजी कोंडदेव आपले विश्वासू व सज्जन कारभारी त्यांच्या बरोबर दिला.
शिवाजी महाराज लहान असतानाच त्यांना दोन उत्तम गुरु लाभले होते. एक दादोजी व दुसरा परमश्रेष्ठ गुरु ती म्हणजे मातोश्री जिजाबाई. माता जिजाबाईच कर्तुत्व फार थोर म्हटल पाहिजे शिवाजीच्या बालपणावर त्यांचे संस्कार घडी-घटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पडण्यासारख हे जिजामाते नि केल. महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा ती मुलांना रोज सांगे, तर दुसऱ्या तऱ्हेचे राजकारणाचे धडे, जहागीरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती दादाजी कोंडदेव देत होते.
योवनाचा उच्चेद करून आपणच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे विचार शिवरायांच्या मनात घोळू लागले. जिजामातेच्या व माता जगदंबेच्या शुभाआशिर्वादाने शिवाजीने तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे शिवाजी राजांनी आजुबाजुंचे किल्ले जिंकून घेण्यास सुरवात केली. १६४६ सालापासून शिवाजी राजांनी चाकण, पुरंदर, रोहिदा, राजमाची असे अनेक किल्ले घेतले आणि १६७४ साली शिवाजी महाराज छत्रपती झाले. जिजाबाईच्या आयुष्यातली एकच एक इच्छा ” आपल मराठ्यांचे स्वतंत्र राज्य व्हाव” ती तिच्या अलवकिक पुत्राने पूर्ण केली. आता जिजाबाईला थकवा आला होता. त्या ८० वर्षाच्या होत आल्या होत्या. राज्यारोहणाचा सोहळा डोळाभर पाहिल्यानंतर पंधराच दिवसांनी १६७४ च्या जून महिन्यात राजमाता जिजाबाई स्वर्गवासी झाल्या. मत कशी असावी याचा एक उच्च आदर्शच त्यांनी आपल्या जीवनात निर्माण केला यात काही शंकाच नाही.
Get detailed information About Rajmata Jijabai, date of birth and birth place of Rajmata Jijabai mother of Shivaji Maharaj.