आपलं या विश्वात कुणीही नाही




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Nobody is your in This world You came alone and you have to go alone Nobody is your in This world. this articles is written by Pradeep Narhari Kelkar. Lihu wachu Anande. Lihu wachu anande.
apla ya wishwat koni nahi

लिहू वाचू आनंदे…

आपलं या विश्वात कुणीही नाही. फक्त आपणच आपले आहोत असा विचार केला तरी एक गोष्ट लक्षात घ्यावयास पाहिजे की कुणीही आपलं नसलं तरी आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक क्षण हे आपले आहेत नी केवळ ते क्षण आपल्यासाठी आलेले आहेत. त्या क्षणांचे स्वागत आपण आनंदानी करावयास हवे, कारण याचं क्षणांमुळे आपलं आयुष्य फुलतं असतं, बहरत असतं. या क्षणांना आपण जर विसरलो तर आयुष्य भकास वाटेल. म्हणूनच प्रत्येक येणा-या क्षणाला महत्व आहे. आयुष्यात येणारा क्षण हा दु:खी असो किंवा सुखी असो, पण तो आपला आहे. हेच क्षण आपल्याला खूप काही शिकवीतही असतात. दु:खाच्या क्षणातून आपल्याला धैर्य, जीवन कसं जगावं, कष्टाचे महत्व इ. समजून येत असतं. सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात आनंद, समाधान, मान, कीर्ती यांचा लाभ करून देत असतात. कुणीही आपलं नाही असं वाटतं असलं तरीही हे क्षण आपले आहेत हे कदापि विसरून चालणार नाही. एक निस्वार्थी सोबती म्हणून या क्षणांकडे पहावं. एक सत्य आहे ते म्हणजे क्षण आपल्याकडून कुठलीच अपेक्षा करीत नाहीत. या क्षणांबद्दल आपल्याला काय वाटतं, सांगाल का मला…

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, २४०९२०१३.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu